Ram Mandir | फोन, रोकड, ATM लंपास! रामललाच्या दर्शनासाठी आलेल्यांमध्ये चोरट्यांचा वावर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | 22 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक ठरला आहे. अयोध्येतील नवे राम मंदिर या दिवपासून सर्वसामान्यांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहिल्याच दिवशी अडीच ते तीन लाखांहून अधिक भाविकांनी रामललाच्या दर्शनासाठी हजेरी लावली. मंदिराच्या गेटवर जमाव जमला असताना अनेक पाकिटमारांनी परिस्थितीचा गैरफायदा घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. पाकिटमारींनी हँडबॅग आणि भक्तांच्या खिशांना लक्ष्य केले आणि रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तू पळवल्या.

रामललाच्या दर्शनासाठी येणारी भाविकांची मोठी गर्दी पाहता उत्तर प्रदेश पोलिसांनी फौज वाढवली होती. उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव गृह संजय प्रसाद आणि विशेष डीजी कायदा व सुव्यवस्था प्रशांत कुमार मंदिराच्या गर्भगृहात निरीक्षणासाठी उपस्थित होते. पण, तरीदेखील चोरट्यांनी हात साफ केले. सकाळी 7 वाजल्यापासूनच मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले असताना रात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती.

अयोध्येत चोरट्यांचा वावर

NDTV या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, अयोध्येतील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भाविकांच्या पैशावर डल्ला मारला. चोरट्यांनी रोख रकमेसह हँडबॅग आणि फोन लंपास केले. रामललाच्या दर्शनासाठी पूर्णिमा ही महिला कॅनडाहून अयोध्येत आली होती. प्रभू श्री रामाचे दर्शन घेण्यापूर्वी अनेक तास तिला रांगेत उभे राहावे लागले. मात्र, काही वेळाने तिच्या हँडबॅगमधून पैसे आणि इतर वस्तू गायब असल्याचे तिच्या लक्षात आले.

Ram Mandir परिसरात चोरीच्या घटना

बॅगेची तपासणी केली असता ती फाटलेल्या अवस्थेत दिसली. एकूणच चोरट्यांनी ब्लेडच्या साहाय्याने बॅग फाडली आणि पैसे लंपास केले. पूर्णिमाची मैत्रिण प्राप्ती हिच्यासोबतही असेच घडले. कारण तिच्याही बॅगेतील तिचे आधार कार्ड, एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर कागदपत्रे चोरीला गेली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला.

दरम्यान, या चोरीच्या घटनांमागे शहराबाहेरील गुन्हेगारांची टोळी असू शकते, असा स्थानिक रहिवाशांचा संशय आहे. NDTV ने या वृत्तसंस्थेने सायबर कॅफेच्या मालकाचा हवाला देत सांगितले की, मागील दोन दिवसांत त्यांच्या दुकानात 20 हून अधिक लोक चोरीच्या तक्रारी दाखल करण्यासाठी आले होते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरक्षा उपायांचा एक भाग म्हणून श्री रामजन्मभूमी मंदिर परिसराचे हवाई सर्वेक्षण केले. कारण हजारो भाविक दर्शनासाठी अयोध्येत येत आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने भाविकांना गोंधळ टाळण्यासाठी दर्शनाच्या वेळा आणि सूचना जारी केल्या आहेत. सकाळी 7 ते 11.30 आणि दुपारी 2 ते 7 या वेळेत भाविकांना रामललाच्या मूर्तीचे दर्शन घेता येईल. तसेच मंदिर दररोज दुपारी 1 ते 3 या वेळेत दर्शनासाठी बंद राहणार आहे.

News Title- Thieves have stolen phones, cash and ATMs of devotees who came on the inauguration day of Ram temple in Ayodhya in Uttar Pradesh.
महत्त्वाच्या बातम्या –

कोण होते माजी मुख्यमंत्री Karpuri Thakur? ज्यांना मिळणार ‘भारतरत्न’, वाचा सविस्तर

Virat Kohli ची सुट्टी! युवा खेळाडूला ‘संधी’, IND vs ENG साठी द्रविडनं सांगितली रणनीती

Nita Ambani वापरतात ‘या’ बड्या कंपनीचा फोन; किंमत लाखोच्या घरात, अयोध्येत दिसली झलक

Kangana Ranaut | अयोध्येतून परतताच कंगना रनौतने केली मोठी घोषणा!

Uddhav Thackeray | “आमची सत्ता येऊ दे, तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही बघा”