BCCI Awards 2024 | गिल सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू; शमी, अश्विन, बुमराहसह शास्त्रींचाही सन्मान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

BCCI Awards 2024 | इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सलामीचा सामना हैदराबाद येथे खेळवला जाणार आहे. यशस्वी जैस्वाल, रविचंद्रन अश्विन यांच्यासह अनेक खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आसामकडून खेळणाऱ्या रियान परागलाही विशेष पुरस्कार मिळाला आहे.

कोविडमुळे बीसीसीआयला मागील तीन वर्ष हे पुरस्कार देता आले नव्हते. मात्र यंदा बोर्डाने तीन वर्षांचे एकत्रित मिळून पुरस्कार दिले आहेत. भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिलला पॉली उमरीगर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला आहे. भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालला 2022-23 या वर्षासाठी दिलीप सरदेसाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गिल सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू

सर्वाधिक धावा केल्याबद्दल जैस्वालला हा पुरस्कार मिळाला आहे. तर रविचंद्रन अश्विनला सर्वाधिक विकेट्ससाठी हा पुरस्कार देण्यात आला. राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळणाऱ्या आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आसामचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रियान परागला 2022-23 या वर्षासाठी मर्यादित षटकांमध्ये सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार मिळाला. फिरकीपटू अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या आणि त्याच मालिकेत जैस्वालने सर्वाधिक धावा करण्याची किमया साधली.

 

युवा रियान पराग शिवाय ऋषी धवनची 2020-21, 2021-22 या वर्षातील मर्यादित षटकांमध्ये सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. 2019-20 या वर्षासाठी बाबा अपराजितची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सरांश जैनला 2022-23 या वर्षासाठी रणजी करंडक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच मुंबईच्या शम्स मुलाणीला रणजी ट्रॉफी 2021-22 मध्ये सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. त्रिपुराच्या एमबी मुरासिंगला 2019-20 हंगामासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

BCCI Awards 2024 जाहीर

2023 या वर्षात चमकदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला 2022-23 या वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला आहे. जसप्रीत बुमराहला 2021-22 या वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटूचा पॉली उमरीगर पुरस्कार मिळाला. तर, रविचंद्रन अश्विनला 2020-21 साठी हा पुरस्कार मिळाला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला 2019-20 साठी हा पुरस्कार मिळाला आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने प्रभावी कामगिरी करणाऱ्या सर्फराज खानला 2021-22 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा केल्याबद्दल माधवराव सिंधिया पुरस्कार देण्यात आला. मयंक अग्रवालला 2022-23 हंगामासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. राहुल दलालला 2019-20 हंगामासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. जलज सक्सेनाला 2022-23 मध्ये रणजी ट्रॉफीमधील अप्रतिम कामगिरीसाठी माधवराव सिंधिया पुरस्कार मिळाला आहे. शम्स मुलाणीला 2021-22 हंगामासाठी आणि 2019-20 चा हा पुरस्कार जयदेव उनाडकटने पटकावला.

 

रवी शास्त्रींचाही सन्मान

भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही सन्मान करण्यात आला. बीसीसीआयने भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला आहे. जीवनगौरव पुरस्कार ही एक मोठी कामगिरी मानली जाते.

महिला शिलेदारांचाही सन्मान

2019-20, 2022-23 या वर्षांतील भारताची सर्वोत्कृष्ट महिला अष्टपैलू खेळाडू म्हणून दीप्ती शर्मा हिची निवड करण्यात आली आहे. तर संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिला 2020-21, 2021-22 या वर्षासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. प्रिया पुनियाला 2019-20 वर्षासाठी, शेफाली वर्माला 2020-21 साठी, एस मेघनाला 2021-22 साठी आणि अमनजोत कौरला 2022-23 साठी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय डेब्यू महिला पुरस्काराने गौरवण्यात आले.

News Title- BCCI Awards 2024 Shubman Gill, Mohammad Shami, R Ashwin, Jasprit Bumrah, Smriti Mandhana and Ravi Shastri among others honored
महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir | फोन, रोकड, ATM लंपास! रामललाच्या दर्शनासाठी आलेल्यांमध्ये चोरट्यांचा वावर

कोण होते माजी मुख्यमंत्री Karpuri Thakur? ज्यांना मिळणार ‘भारतरत्न’, वाचा सविस्तर

Virat Kohli ची सुट्टी! युवा खेळाडूला ‘संधी’, IND vs ENG साठी द्रविडनं सांगितली रणनीती

Nita Ambani वापरतात ‘या’ बड्या कंपनीचा फोन; किंमत लाखोच्या घरात, अयोध्येत दिसली झलक

Kangana Ranaut | अयोध्येतून परतताच कंगना रनौतने केली मोठी घोषणा!