Ayodhya Ram Temple | अयोध्येत रामलल्लानंतर सीता आणि हनुमानही विराजणार; ट्रस्टचा मोठा प्लॅन आला समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ayodhya Ram Temple | अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचं 22 जानेवारीला मोठ्या उत्साहात उद्घाटन झालं. देशभरातील दिग्गज पाहुण्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचं उद्घाटन केलं. आजपासून भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेशदेखील दिला जात आहे. भक्तांची रामलल्लाच्या दर्शनासाठी एकच रांग लागली आहे. मंदिराचा दूसरा तळ बांधणं अजून बाकी आहे.

मिळालेल्या महितीनुसार म्हटलं जातं आहे की, दुसऱ्या तळावर ‘राम परिवार’ (Ayodhya Ram Temple) विजमान होणार आहे. या ठिकाणी राम-सीता, रामाचे भाऊ भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि हनुमान यांच्या मूर्ती स्थापित केल्या जाणार आहेत. श्री रामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंद देव गिरि महाराज (Swami Govind Dev Giri) यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

अजून 13 नवीन मंदिरे उभारली जाणार

राम मंदीराच्या (Ayodhya Ram Temple) आसपासच अजून 13 मंदिरे उभारली जाणार आहेत. ज्यामध्ये 5 प्रमुख देवता यांचा समावेश आहे. यात गणपती, सूर्य, शिव, विष्णु आणि देवी यांच्या मंदिराचा समावेश आहे. नवीन राम मंदिर परिसरात 6 मंदिर उभारले जाणार आहेत. तर बाहेरील परिसरात 7 मंदिर बनतील.

यात हनुमान यांचे वेगळे नवीन मंदिर बनवले जाणार आहे. तसेच, जिथे सीता रसोई आहे तिथे अन्नपूर्णा मातेचे मंदिर बनवले जाणार आहे. येथूनच भाविकांना प्रसाद वाटप केलं जाईल. ट्रस्टने सांगितले की, आतापर्यंत 1100 कोटी रुपए मंदिरासाठी खर्च झाले आहेत. त्यात आता अंदाजे 1400 कोटी हनुमान मंदिरासाठी खर्च केले जातील. आमच्याकडे सध्या जवळपास 3000 कोटी रुपये उरले आहेत.

राम मंदीरासाठी IIT चा मोठा वाटा

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी म्हणाले की, आयआयटी रुरकी, आयआयटी गुवाहाटी, आयआयटी सूरत, आयआयटी मुंबई, आयआयटी कानपूर आणि आयआयटीच्या तज्ञांकडून राम मंदिरसाठी महत्वाचा सल्ला आणि मार्गदर्शन मिळाले आहे. या संस्थांच्या तज्ज्ञांनी नेहमीच मदत केली असल्याने आता मंदिराच्या (Ayodhya Ram Temple) सुरक्षेची चिंता नाही. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आपण हे काम पूर्ण करू शकलो नसतो, असेही स्वामी गोविंद देव गिरी म्हणाले आहेत.

त्यामुळे येणाऱ्या काही वर्षांत अजून 13 मंदिरे बनवली जाणार आहेत. अयोध्येत फक्त रामलल्लाच नाही तर भाविकांना माता सीता आणि हनुमान यांचेही दर्शन घेता येईल. या मंदिराचे काम लवकरच सुरू होणार असल्याचेही स्वामी गोविंद देव गिरी म्हणाले आहेत.

News Title-  After Ayodhya Ram Temple Grand Plan For 13 More

 महत्त्वाच्या बातम्या –

Shoaib Malik | “..मग सानियाशी निकाह का केला?”; शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर शाहरूख खानचा व्हिडीओ व्हायरल

“अल्लाह त्याला याच जोडीदारासोबत…”, Shoaib Malik चे तिसरे लग्न; आफ्रिदीच्या हटके शुभेच्छा

Ram Mandir | 11 कोटी रूपये! गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याकडून रामललाला रत्नांनी जडलेला मुकुट ‘भेट’

BCCI Awards 2024 | गिल सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू; शमी, अश्विन, बुमराहसह शास्त्रींचाही सन्मान

Ram Mandir | फोन, रोकड, ATM लंपास! रामललाच्या दर्शनासाठी आलेल्यांमध्ये चोरट्यांचा वावर