Shoaib Malik | “…मग सानियाशी निकाह का केला?”; शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर शाहरूख खानचा व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shoaib Malik | भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या घटस्फोटाच्या चर्चाना शोएबच्या तिसऱ्या लग्नाने पूर्णविराम दिला. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत (Sana Javed) लग्न करून सर्वांनाच धक्का दिला.

शोएबच्या विवाहबाह्य संबंधांमुळेच सानियाने त्याला खुला’ दिल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र शोएबच्या लग्नाचीच अधिक चर्चा होत आहे. अशातच आता एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात शाहरुख खानने ( Shahrukh Khan) थेट शोएबलाच मोठा सवाल केला आहे. या व्हिडीओत शाहरुख सानिया आणि शोएबला अनेक प्रश्न विचारताना दिसत आहे. तसा हा व्हिडीओ जुना आहे. मात्र आता तो व्हायरल होत आहे.

‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

एका कार्यक्रमानिमित शाहरुख खान, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक एका मंचावर आले होते. यावेळी शाहरुख सानियाला म्हणतो, “याच्यामध्ये (शोएब) (Shoaib Malik) तुला नेमकं काय दिसलं. ज्यामुळे तु त्याला आयुष्यभरासाठी निवडलंस?, तो क्रिकेटपटू आहे, दिसायलाही चांगला दिसतो. पण त्याच्यात कोणती खास गोष्ट आहे?”, यावर सानियाने “तो खूप लाजाळू आणि कमी बोलणारा आहे. त्याला तुम्ही बोलणं शिकवलं पाहिजे.”, असे म्हणते.

सानियाच्या उत्तरावर शाहरुखनेही लगेच प्रतिक्रिया दिली. ‘तु काळजी करू नकोस. मी त्याला सांभाळून घेईल.’, असे शाहरुख म्हणतो. यानंतर त्याने शोएबलाही सवाल केला. “तुला सानियामध्ये काय दिसलं कई तु तिच्याशी लगेच निकाह केलास.”, या प्रश्नावर शोएबने थोडक्यातच उत्तर देऊन टाकले. ‘मला याचा विचार करायला वेळच मिळाला नाही, त्यापुर्वीच आमचं लग्न झालं.”, असे तो म्हणतो. हा व्हिडीओ जुना आहे पण शोएबने सानियाला घटस्फोट देत तिसरं लग्न केल्यामुळे तो चर्चेत आला आहे.

शोएबने केलं तिसरं लग्न

शोएब मलिकची (Shoaib Malik) तिसरी पत्नी सना जावेद एक प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आहे. 25 मार्च 1993 मध्ये सौदी अरबमध्ये तिचा जन्म झाला. आता ती 30 वर्षांची आहे. तर, शोएबचा जन्म 1 फेब्रुवारी 1982 मध्ये सियालकोट पाकिस्तान येथे झाला. या जोडप्यात तब्बल 11 वर्षे वयाचा फरक आहे. दोघांनीही लग्न करत आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे.

सना जावेदने 2012 मध्ये ‘शेहर-ए-जात’ या चित्रपटातून फिल्मी दुनियेत प्रवेश केला. यासोबतच तीने अनेक मालिकांमध्येही भूमिका केली. ‘खानी’ या रोमँटिक ड्रामानंतर ती प्रसिद्धीस आली. सनाने बेहद, शारीक-ए-हयात, दीनो की दुल्हनिया आणि आय लव यू जादा अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे.

News Title :  Shoaib Malik and Shahrukh Khan video goes viral

महत्वाच्या बातम्या- 

Ram Mandir | 11 कोटी रूपये! गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याकडून रामललाला रत्नांनी जडलेला मुकुट ‘भेट’

BCCI Awards 2024 | गिल सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू; शमी, अश्विन, बुमराहसह शास्त्रींचाही सन्मान

Ram Mandir | फोन, रोकड, ATM लंपास! रामललाच्या दर्शनासाठी आलेल्यांमध्ये चोरट्यांचा वावर

कोण होते माजी मुख्यमंत्री Karpuri Thakur? ज्यांना मिळणार ‘भारतरत्न’, वाचा सविस्तर

Virat Kohli ची सुट्टी! युवा खेळाडूला ‘संधी’, IND vs ENG साठी द्रविडनं सांगितली रणनीती