“अल्लाह त्याला याच जोडीदारासोबत…”, Shoaib Malik चे तिसरे लग्न; आफ्रिदीच्या हटके शुभेच्छा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shoaib Malik | पाकिस्तानी खेळाडू नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. अलीकडेच पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिकने तिसरे लग्न केले अन् भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झापासून शोएब विभक्त झाला. शोएब मलिक गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले आहे. 41 वर्षीय शोएबने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली.

शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर भारतीय चाहत्यांनी रोष व्यक्त केला. तर काही चाहत्यांनी आणि सहकारी खेळाडूंनीही या जोडप्याला शुभेच्छा दिल्या. यामध्ये पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या नावाचाही समावेश आहे. शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या माजी सहकारी मलिकला त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल मजेदार पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

शाहिद आफ्रिदीच्या मलिकला शुभेच्छा

खरं तर आफ्रिदी पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीशी बोलत होता. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, रिपोर्टर आफ्रिदीला विचारतो की, शोएब मलिकचे तिसरे लग्न झाले आहे? यानंतर 46 वर्षीय आफ्रिदीने उत्तर देताना म्हटले, “शोएब मलिकचे खूप खूप अभिनंदन. अल्लाह त्याला या जीवनसाथीसोबत आयुष्यभर आनंदी ठेवो.”

दरम्यान, शोएब मलिकने 2002 मध्ये आयशा सिद्दीकीशी पहिले लग्न केले आणि 2010 मध्ये मलिकने तिला घटस्फोट दिला आणि माजी भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाशी लग्न केले. शोएब आणि सानिया यांना एक मुलगा आहे. मलिकच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो समोर येताच एकच खळबळ माजली.

 

Shoaib Malik चे तिसरे लग्न

शोएबने तिसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट केल्यानंतर सानियाच्या वडिलांनी मीडियाला मुलाखत देताना खुलासा केला होता की, पाकिस्तानी क्रिकेटर मलिकने ‘खुला’ प्रक्रियेअंतर्गत सानियापासून घटस्फोट घेतल्यानंतरच तिसरे लग्न केले आहे. खुला म्हणजे मुलीच्या संमतीने वेगळे होणे, तर एखादा पुरूष त्याच्या सहमतीने पत्नीपासून दूर जात असेल तर त्याला तलाक असे म्हणतात.

मलिकची तिसरी पत्नी सना जावेद पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकपेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. तिचे हे दुसरे लग्न आहे, याआधी तिने 2020 मध्ये पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक उमेर जसवालसोबत लग्न केले होते. सना ही पाकिस्तानातील आघाडीची अभिनेत्री आहे.

News Title- After divorcing Indian tennis star Sania Mirza, Pakistani cricketer Shoaib Malik married actress Sana Javed, Shahid Afridi has wished him
 महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir | 11 कोटी रूपये! गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याकडून रामललाला रत्नांनी जडलेला मुकुट ‘भेट’

BCCI Awards 2024 | गिल सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू; शमी, अश्विन, बुमराहसह शास्त्रींचाही सन्मान

Ram Mandir | फोन, रोकड, ATM लंपास! रामललाच्या दर्शनासाठी आलेल्यांमध्ये चोरट्यांचा वावर

कोण होते माजी मुख्यमंत्री Karpuri Thakur? ज्यांना मिळणार ‘भारतरत्न’, वाचा सविस्तर

Virat Kohli ची सुट्टी! युवा खेळाडूला ‘संधी’, IND vs ENG साठी द्रविडनं सांगितली रणनीती