Ramlalla Jewellery | अयोध्येमध्ये 22 जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र यांनी मंदिराचे उद्घाटन केले. या सोहळ्याला साधारण आठ हजार पाहुणे उपस्थित होते. यात देशातील दिग्गज उद्योजक, कलाकार, खेळाडू तसेच प्रतिष्ठित नामवंतांचा समावेश होता. 500 वर्षांनी राम आपल्या जन्मभूमीत पुन्हा परतले. रामलल्लाच्या एका झलकसाठी सर्वांचे नयन तरसले होते.
अखेर 22 जानेवारीला तो दिव्य दिवस उजाडला आणि सर्वांना रामलल्लाच्या मुखाचे दर्शन झाले. हिऱ्या, मोत्यानी केलेला रामलल्लाचा (Ramlalla Jewellery) दिव्य शृंगार डोळ्यात भरण्याजोगा होता. रामलल्लाच्या दिव्य रूप पाहून अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. तर, मन गहिवरून गेले. रामलल्लाला तब्बल 17 प्रकारची वेगवेगळी दागिने घालण्यात आली आहेत. आणि या प्रत्येक दागिन्यांची एक वेगळे वैशिष्ट्य देखील आहे. बदायूंतील सोनार हरसहायमल श्यामलाल ज्वेलर्सच्या लखनौ शाखेने रामलल्लाचे दागिने तयार केले आहेत .अयोध्येतील कवी यतिेंद्र मिश्रा यांच्या सूचनेनुसार राम लल्लाचे दागिने तयार करण्यात आले आहेत.
प्राचीन धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून दागिने तयार करण्यात आली
श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सांगितले की, रामलल्लाचे दागिने (Ramlalla Jewellery) तयार करण्यासाठी अगोदर रामायण, वाल्मिकी रामायण, रामचरितमानस आणि अलवंदर स्तोत्रम यांसारख्या ग्रंथांवर दीर्घ संशोधन करण्यात आले. या संशोधनानंतर सर्व माहिती घेऊन दागिने तयार करण्यात आली. माथ्यावरील मुकुट, हार, कपाळावरचा टिळक, अंगठी, कंबरेची पट्टी, हातातील बांगड्या आणि कानातल्या रिंगपासून प्रत्येक दागिन्यांमध्ये कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे. रामायण आणि महाभारतचा अभ्यास करून त्या दागिन्यांवर काम केले गेले आहे. हे सर्व दागिने किती दिवसांत आणि कसे तीर झाले, त्याची किंमत काय याबाबत अधिक जाणून घेऊयात.
Ramlalla Jewellery | रामलल्लाच्या दागिन्यांची वैशिष्ट्ये
रामलल्लाचे दागिने तयार करणारे श्यामलाल ज्वेलर्सचे अंकुर अग्रवाल यांनी सांगितले की, रामलल्लाला मुकुटासह 14 दागिन्यांनी सजवण्यात आले आहे. हे सर्व दागिने फक्त 10 ते 12 दिवसांत तयार करण्यात आले आहेत. 1 जानेवारीला ट्रस्टने याची ऑर्डर दिली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 2 जानेवारी रोजी ते रामलल्लाचे माप घेण्यासाठी अयोध्येला गेले. एवढेच नाही तर रामलल्लाला खेळण्यासाठी सोन्या-चांदीचे हत्ती, घोडे आणि 6 खेळणीही बनवण्यात आली होती. या 14 दागिन्यांमध्ये रामललाचा मुकुट, कानातल्या अंगठ्या, गळ्यात चार हार, हातात बांगड्या, कंबरेला पट्टी, हातात अंगठ्या, टिळक आणि धनुष्यबाण यांचा समावेश आहे.
मुकुट- रामलल्लाचा मुकूटाची (Ramlalla Jewellery)सध्या प्रचंड चर्चा होत आहे. हा मुकुट 1 किलो 700 ग्रॅम सोन्याने बनवण्यात आला आहे. मुकुटात 75 कॅरेट हिरा, 175 कॅरेट पन्ना, 262 कॅरेट रुबी आणि माणिक लावले आहेत. सूर्यवंशी यांचे प्रतिक म्हणून मुकुटात सूर्याचे चिन्हही लावण्यात आले असून दोन हिरे बसवण्यात आले आहेत, जे शेकडो वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येत आहे. मुकुटात मोर आणि मासेही बनवण्यात आले आहेत. मुकुटाला तीन पंखे आणि मध्यभागी एक मोठा पन्ना आहे. पन्ना हा बुधचा स्वामी आहे. पन्ना ही राजघराण्यांची ओळख आहे, म्हणून त्यांचा वापर रामलल्लाच्या दागिन्यांमध्ये केला आहे.
टिळक- रामलल्लाच्या माथ्यावरील (Ramlalla Jewellery) टिळकही अद्भुत आहे. हा टिळक बनवण्यासाठी 16 ग्रॅम सोन्याचा वापर करण्यात आला आहे. टिळकच्या मध्यभागी तीन कॅरेटचे हिरे आणि दोन्ही बाजूला सुमारे 10 हिरे लावले आहेत. टिळकच्या मध्यभागी एक विशेष माणिक ठेवला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे रामनवमीच्या दिवशी ठीक 12 वाजता सूर्याची किरणे खालून टिळकावर पडतील आणि पुढील 5 मिनिटांत वरच्या दिशेने मुकुटाकडे जातील.
अंगठी- रामलल्लाच्या हातात पन्नाची अंगठी घालण्यात आली आहे. या अंगठीचे वजन अंदाजे 65 ग्रॅम असून त्यांच्या उजव्या हातात 26 ग्रॅम सोन्याची अंगठी आहे.
गळ्यातील हार- रामलल्लाच्या गळ्यात सोन्याची विजयमाळ घातली आहे. ही विजयमाळ तब्बल 22 कॅरेट सोन्यापासून बनवण्यात आली आहे.यात वैष्णव परंपरेतील सर्व शुभ चिन्हे आहेत. सुदर्शन चक्र, पद्मपुष्म, शंख आणि मंगल-कलश ही ती चिन्हे आहेत. यासोबतच देवतेला प्रिय असलेल्या कमळ, चंपा, पारिजात, कुंड आणि तुळशी या पाच प्रकारच्या फुलांनी त्याला सुशोभित केले आहे. रामलल्लाच्या गळ्यात सुमारे 500 ग्रॅम सोन्याचा हार देखील आहे. याच्या मध्यभागी सूर्यदेवाचे प्रतीक आहे आणि त्याच्या बाजूला रुबीची फुले, पन्ना आणि नैसर्गिक हिरे वापरण्यात आली आहेत.
कंबरपट्टा- कंबरेला सजवण्यासाठी 750 ग्रॅम सोन्याचा कंबरपट्टा बनवण्यात आला असून त्यात 70 कॅरेट हिरे आणि 850 कॅरेट माणिक आणि पन्ना लावण्यात आले आहेत. यासोबतच पवित्रतेची अनुभूती देण्यासाठी कंबरपट्टा मध्ये 5 लहान घंटा ठेवण्यात आल्या आहेत.
बांगड्या- रामलल्लासाठी 22 कॅरेट सोन्याचे 400 ग्रॅम वजनाचे बाजूबंद बनवण्यात आले आहे. याशिवाय हातात सोन्याच्या बांगड्या आहेत, ज्यामध्ये माणिक, पाचू आणि हिरे जडलेले आहेत.
धनुष्यबाण- प्रभू रामाचे धनुष्यबाण बनवण्यासाठी तब्बल एक किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. रामलल्लाला हे सर्व दागिने घालण्यासाठी दीड तास लागला होता. तसेच सात दिवस रामलल्लाचा वेगवेगळा शृंगार करण्यात येणार आहे. यासाठी सात दिवसासाठी वेगवेगळे दागिने तयार करण्यात आली आहेत.
News Title- Ramlala Jewellery Special features
महत्वाच्या बातम्या-
“अल्लाह त्याला याच जोडीदारासोबत…”, Shoaib Malik चे तिसरे लग्न; आफ्रिदीच्या हटके शुभेच्छा
Ram Mandir | 11 कोटी रूपये! गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याकडून रामललाला रत्नांनी जडलेला मुकुट ‘भेट’
BCCI Awards 2024 | गिल सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू; शमी, अश्विन, बुमराहसह शास्त्रींचाही सन्मान
Ram Mandir | फोन, रोकड, ATM लंपास! रामललाच्या दर्शनासाठी आलेल्यांमध्ये चोरट्यांचा वावर
कोण होते माजी मुख्यमंत्री Karpuri Thakur? ज्यांना मिळणार ‘भारतरत्न’, वाचा सविस्तर