Republic Day Weekend | प्रजासत्ताक दिनी फिरायला जायचंय?; मग ‘ही’ ऐतिहासिक ठिकाणे ठरतील बेस्ट ऑप्शन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Republic Day Weekend | यंदाचा प्रजासत्ताक दिन शुक्रवारी आल्याने सलग तीन दिवस सुट्ट्या मिळाल्या आहेत. म्हणजेच शुक्रवारी प्रजासत्ताक दिन नंतर शनिवार आणि रविवारची लागूनच सुट्टी आल्याने तुम्हाला तीन दिवसांचा हॉलिडे मिळाला आहे. या तीन दिवसांत तुम्हीही कुठे बाहेर फिरायला जायचा प्लॅन (Republic Day Weekend) करत असाल तर इथे तुम्हाला काही बेस्ट ऑप्शन मिळतील.

तुम्ही जर ऐतिहासिक ठिकाणे फिरण्यासाठी आतुर असाल तर, तुम्हाला काही प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणांची यादी इथे मिळून जाईल. तुम्हाला जर देशभक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला काही पर्याय इथे देण्यात येत आहेत. जिथे तुम्हाला अनेक गोष्टी जाणून घेता येतील.

‘ही’ ऐतिहासिक ठिकाणे ठरतील बेस्ट ऑप्शन

दिल्ली – तुम्हाला दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा पाहायचा असेल तर (Republic Day Weekend) तुम्ही दिल्लीवारी करू शकता. दिल्लीत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर परेड होतात. ही परेड राष्ट्रपती भवनाच्या गेटपासून सुरू होऊन ड्युटी मार्ग ओलांडून इंडिया गेटपर्यंत पोहोचते. त्यामुळे तुम्ही या हॉलिडेमध्ये दिल्लीवारी करू शकता.

जालियनवाला बाग – आपल्या देशात जालियनवाला बागला मोठा इतिहास आहे. तुम्हाला हा इतिहास अनुभव करायचा असेल तर तुम्ही 26 जानेवारीला जालियनवाला बागलाही भेट देऊ शकता. जालियनवाला बाग तेच ठिकाण आहे जिथे हजारो निष्पाप लोकांवर ब्रिटिशांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. जालियनवाला बाग अमृतसर, पंजाब येथे स्थित आहे आणि हे ठिकाण हौतात्म्याचे सर्वात मोठे प्रतीक आहे. येथे तुम्ही वाघा-अटारी सीमा देखील पाहू शकता.

साबरमती आश्रम – महात्मा गांधी यांच्या जीवनाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर, तुम्ही अहमदाबाद येथे स्थित साबरमती आश्रमला भेट देऊ शकता. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान महात्मा गांधींच्या जीवनाची या आश्रमात अनेक आठवणी दिसून येतात. प्रजासत्ताक दिनानिमित्त येथे अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

कारगिल वॉर मेमोरियल- लडाख हे ठिकाण बऱ्याच जणांचे आवडते ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day Weekend) कारगिल वॉर मेमोरियलला भेट देऊ शकता. 1999 मध्ये कारगिल युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानचा पराभव केला होता. या युद्धात शहीद झालेल्या भारताच्या शूर सुपुत्रांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कारगिल युद्ध स्मारक बांधण्यात आले आहे.यासोबतच इतर ठिकाणेही तुम्ही इथे पाहू शकता. प्रजासत्ताक दिनाच्या हॉलिडेनिमित्त तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता.

News Title- Visit historical places on Republic Day Weekend

 महत्त्वाच्या बातम्या –

Rashmi Thackeray | ‘रश्मी ठाकरे यांच्या रुपात माँसाहेब दिसतात’; भास्कर जाधवांकडून कौतुक, रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर

Mukesh Ambani | उद्योगपती मुकेश अंबानी देशवासीयांना देणार सर्वांत मोठं गिफ्ट!

Sania Mirza आणि मोहम्मद शमी लग्नबंधनात अडकणार?; चर्चांना उधाण

Ayodhya Ram Temple | अयोध्येत रामलल्लानंतर सीता आणि हनुमानही विराजणार; ट्रस्टचा मोठा प्लॅन आला समोर

Bigg Boss 17 | विकी जैननंतर टॉप 5 मधून ‘या’ तगड्या स्पर्धकाचाही पत्ता कट होणार?