Mukesh Ambani | उद्योगपती मुकेश अंबानी देशवासीयांना देणार सर्वांत मोठं गिफ्ट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mukesh Ambani | अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाचा भव्य सोहळा पार पडला. यानंतर आता देशात केंद्रीय अर्थसंकल्प आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं सत्र सुरू होईल. भाजपला राम मंदिराचा मोठा फायदा होणार असल्याचं राजकारणात म्हटलं जात आहे. तर त्यापुर्वी उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) देशवासीयांना नव्या वर्षात सर्वांत मोठं गिफ्ट देणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मुकेश अंबानी यांच्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणुकीपुर्वी भाजपचा देखील हाच प्लॅन असल्याचं म्हटलं जात आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोदी सरकार लवकरच पेट्रोल-डीजेलच्या किमतीत घट करणार असल्याची चर्चा आहे. आता मुकेश अंबानी यांच्यामुळे किमती कशा कमी होतील, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचेही उत्तर इथेच आहे.

देशात पेट्रोल-डीजेलच्या किमती घटणार?

राम मंदिर उद्घाटनानंतर सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा भारत भ्रमण करण्यास सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे भाजप राम मंदिराचा मुद्दा गाजवेल. अशात आठवडाभरानंतर अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापुर्वी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) तीन वर्षात जे झाले नाही, ते करून दाखवणार आहेत.

पेट्रोल-डीजेलच्या किमती कमी करण्यात अंबानी मोदी सरकारला हातभार लावणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही महिन्यांपुर्वी पेट्रोलियम मंत्रालयाने एक निर्णय घेतला होता. त्यानुसार ज्या देशांवर निर्बंध नाहीत, अशा कोणत्याही देशाकडून भारत कच्चे तेल आयात करु शकतो, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे व्हेनेझुएला या देशाकडून भारत कच्चे तेल खरेदी करू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2019 मध्ये या देशावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता बंदी नसल्यामुळे भारत तीन वर्षांनंतर या देशासोबत करार करू शकतो.

व्हेनेझुएलाकडून भारताला नोव्हेंबर 2020 मध्ये कच्चा तेलाची खेप पाठवली गेली होती. यानंतर या देशासोबत भारताने कोणताच व्यवहार केला नाही. त्यामुळे आता भारत तीन वर्षांनी पुन्हा एकदा व्हेनेझुएलाकडून कच्चे तेलाची मागणी करू शकतो.

मुकेश अंबानी यांची भूमिका काय?

2020 नंतर व्हेनेझुएला देशासोबत भारत करार करू शकतो. या देशाकडून थेट कच्चे तेल खरेदीचा मोठा सौदा होऊ शकतो. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज त्यासाठी पुढे आली असल्याचे म्हटले जात आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) सध्या व्हेनेझुएलाकडे (Venezuela) 3 टँकर कच्चे तेल खरेदीची बुकिंग केली असल्याची माहिती मिळत आहे.

त्यामुळे जानेवारी महिन्यातच कच्चे तेल भारतात यायला सुरुवात होईल. ही खेप देशात आल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारत सध्या रशियाकडून कच्च्या तेलाची आयत करत आहे. व्हेनेझुएलाकडून देशाला 8 ते 10 डॉलर प्रति बॅरलपर्यंत स्वस्तात कच्चे तेल मिळू शकते. त्यामुळे देशात लवकरच पेट्रोल-डीजेलच्या किमती घटणार असल्याचे बोलले जात आहे.

News Title- Mukesh Ambani will give the big gift

 महत्त्वाच्या बातम्या –

“अल्लाह त्याला याच जोडीदारासोबत…”, Shoaib Malik चे तिसरे लग्न; आफ्रिदीच्या हटके शुभेच्छा

Ram Mandir | 11 कोटी रूपये! गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याकडून रामललाला रत्नांनी जडलेला मुकुट ‘भेट’

BCCI Awards 2024 | गिल सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू; शमी, अश्विन, बुमराहसह शास्त्रींचाही सन्मान

Ram Mandir | फोन, रोकड, ATM लंपास! रामललाच्या दर्शनासाठी आलेल्यांमध्ये चोरट्यांचा वावर

कोण होते माजी मुख्यमंत्री Karpuri Thakur? ज्यांना मिळणार ‘भारतरत्न’, वाचा सविस्तर