Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांना कोर्टात बोलवा; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अंतरवली सराटी ते मुंबई असा पायी मोर्चा काढला आहे. यामुळे एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली.

मनोज जरांगेंना उच्च न्यायालयाचे आदेश

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा, सरकारने या मोर्चावर कडक कारवाई करावी, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलीये. न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. यानंतर जरांगेंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Manoj Jarange | “सरकारने रोड ब्लॉक होणार नाही याची खबरदारी घ्यावी”

यावेळी न्यायाधीशांनी गुणरत्न सदावर्ते आणि महाधिवक्ता रविंद्र सराफ यांचा युक्तिवाद ऐकून घेत असताना महत्त्वाचे निर्देश दिले. सरकारने रोड ब्लॉक होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी घ्यावी, असे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले.

मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावा. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजावावी. आझाद मैदानात 5 हजार पेक्षा जास्त लोक येवू शकत नाही हे देखाल कळवण्यात यावं, असंही कोर्टाने म्हटलंय.

दरम्यान, 20 जानेवारीला मराठा समाज लाखोच्या संख्येने अंतरवली सराटी येथून निघाला आहे. आज मराठा आंदोलकांनी पुण्यात प्रवेश केला आहे. या मजलदर मजल करीत निघालेला मराठा समाज येत्या काही दिवसात मुंबई गाठणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Republic Day Weekend | प्रजासत्ताक दिनी फिरायला जायचंय?; मग ‘ही’ ऐतिहासिक ठिकाणे ठरतील बेस्ट ऑप्शन

Saida Imtiaz | शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

Rashmi Thackeray | ‘रश्मी ठाकरे यांच्या रुपात माँसाहेब दिसतात’; भास्कर जाधवांकडून कौतुक, रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर

Mukesh Ambani | उद्योगपती मुकेश अंबानी देशवासीयांना देणार सर्वांत मोठं गिफ्ट!

Sania Mirza आणि मोहम्मद शमी लग्नबंधनात अडकणार?; चर्चांना उधाण