Mira road | मीरारोड परिसरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई!

मीरा-भाईंदर | रविवारी राञी रॅली आटपून येणाऱ्या रामभक्तांवर मीरा रोडच्या (Mira road) नया नगर येथे काही समाजकंटकांनी मारहाण करुन, त्यांच्या गाडीची तोडफोड केली होती. यावरुन नया नगर मध्ये सध्या दोन दिवसापासून संघर्षमय वातावरण सुरु आहे. दिवसभर दोन्ही समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मीरा रोडवर (Mira road) झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी कठोर कारवाई सुरु केली आहे.

पोलिसांची मोठी कारवाई

मंगळवारी पालिकेने नया नगर येथे दुकानाच्या अनधिकृत शेडवर तोडक कारवाई केली. तर नया नगर पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांनाच अटक केली आहे. त्यात चार जण अल्पवयीन आहे.

गुन्हे कायद्यांतर्गत 8 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आयटी कायद्यांतर्गत 2 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यासाठी पोलिसांनी 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, सीसीटीव्हीच्या मदतीने लोकांची ओळख पटवून कारवाई केली जात आहे.

मीरा रोडमध्ये शांतता राखण्यासाठी सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विशेष दलाला पाचारण करण्यात आले आहे. नयानगरमधील बेकायदा बांधकामांवर महापालिकेने धडक कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मीरा रोडच्या नया नगर भागात एकूण 450 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

Mira road | नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री मीरा रोडच्या नया नगर परिसरात दोन गटाच्या रॅली निघाल्या होत्या. या दोन रॅली आमनेसामने आल्यानंतर बाचाबाची झाली त्यांनी परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.मीरा भाईंदर पोलिसांनी परिस्थितीवर काही वेळातच नियंत्रण मिळवले. मात्र सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे. दोन गट जेव्हा आमनेसामने आले त्यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

Manoj Jarange | आझाद मैदानात फक्त एवढ्याच लोकांना परवानगी; हायकोर्टाचे महत्त्वाचे आदेश

Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांना कोर्टात बोलवा; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Republic Day Weekend | प्रजासत्ताक दिनी फिरायला जायचंय?; मग ‘ही’ ऐतिहासिक ठिकाणे ठरतील बेस्ट ऑप्शन

Saida Imtiaz | शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

Rashmi Thackeray | ‘रश्मी ठाकरे यांच्या रुपात माँसाहेब दिसतात’; भास्कर जाधवांकडून कौतुक, रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर