Narendra Modi | “…तरी नरेंद्र मोदी जिवंत राहिले असतील तर मग तो चमत्कारच”; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य चर्चेत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन केलं. या सोहळ्यासाठी महिन्यापासून तयारी करण्यात येत होती. देशभरातील दिग्गज पाहुण्यांना याचं निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. तसेच अनेक राजकीय मंडळीला देखील आमंत्रण पत्रिका पाठवली होती. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) या सोहळ्याचे यजमान होते.

यजमान असल्याने मोदींना 3 दिवसांचा उपवास करण्यास सांगितलं होतं. मात्र, त्यांनी 11 दिवसांचं अनुष्ठान पाळलं. मोदींच्या या उपवासाबद्दल त्यांचं देशभर कौतुक झालं. मात्र त्यांच्या उपवासावर काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने संशय व्यक्त करत मोठं वक्तव्य केलं आहे. हे वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.

मोदींच्या उपवासावर काँग्रेसची शंका

“11 दिवस उपवास केल्यान शरीरावर परिणाम होतात. म्हणजेच मी डॉक्टरसोबत मॉर्निंग वॉकला गेलो असताना त्यांनी मला सांगितले की, 11 दिवस उपवास केल्यानंतर माणूस जिवंत राहू शकत नाही. पण मोदी (Narendra Modi ) जिवंत असतील, तर तो चमत्कार आहे. त्यामुळे त्यांनी उपवास केला का? याबद्दल माझ्या मनात संशय आहे”, असे वक्तव्य कॉँग्रेस नेते वीरप्पा मोईली (Congress leader Veerappa Moily) यांनी केलं आहे. या विधानामुळे राजकारणात एकच चर्चा रंगत आहे.

काँग्रेस नेत्याच्या या वक्तव्याला भाजपनेही प्रत्युत्तर दिलं आहे. “प्रभू श्री राम यांच्याबद्दल श्रद्धा असेल, तर तुम्ही सुद्धा उपवास करुन जिवंत राहू शकता. गांधी कुटुंबाला कितीही खूश करण्याचे प्रयत्न केले तरी मोईली यांना चिक्काबल्लापूरमधून काँग्रेसच तिकीट मिळणार नाही”, असा टोला कर्नाटकामधील भाजप खासदार लहर सिंह सिरोया (BJP MP Lahar Singh Siroya) यांनी मारला आहे.

Narendra Modi यांचा श्रीरामासाठी 11 दिवस तप

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांनी प्राण प्रतिष्ठाच्या दिवशी आपला 11 दिवसांचा उपवास सोडला होता. गोविंद देवगिरी महाराज यांच्या हातून पाणी पिऊन त्यांनी उपवास सोडला. मोदींच्या या तपाची सर्वत्र चर्चा झाली. नरेंद्र मोदी यांना भगवती देवीने हिमालयातून पाठवले असून त्यांना देशसेवेचे कार्य दिले. आपणास असा श्रीमंत योगी मिळाला असल्याचे गोविंदगिरी महाराज यांनी म्हटले होते.

यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचादेखील दाखला दिला होता. छत्रपती शिवाजी महाराज एकदा श्रीशैलम येथे गेले होते. तेव्हा त्यांनी तीन दिवस उपवास केला होता. येथे महाराजांनी सर्व धार्मिक परंपरा पूर्ण केल्या होत्या. असेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व धार्मिक परंपरा पूर्ण केल्या. आम्ही त्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी तीन दिवसांचे उपवास करण्याचे सांगितले होते. परंतु त्यांनी अकरा दिवसांचे कठोर उपवास केले. त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला, असे गोविंद देवगिरी महाराज म्हणाले होते.

News Title- Congress criticizes Narendra Modi 

महत्त्वाच्या बातम्या- 

Rashmi Thackeray | ‘रश्मी ठाकरे यांच्या रुपात माँसाहेब दिसतात’; भास्कर जाधवांकडून कौतुक, रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर

Mukesh Ambani | उद्योगपती मुकेश अंबानी देशवासीयांना देणार सर्वांत मोठं गिफ्ट!

Sania Mirza आणि मोहम्मद शमी लग्नबंधनात अडकणार?; चर्चांना उधाण

Ayodhya Ram Temple | अयोध्येत रामलल्लानंतर सीता आणि हनुमानही विराजणार; ट्रस्टचा मोठा प्लॅन आला समोर

Bigg Boss 17 | विकी जैननंतर टॉप 5 मधून ‘या’ तगड्या स्पर्धकाचाही पत्ता कट होणार?