लोकसभा निवडणुकीनंतर Rahul Gandhi यांना अटक होणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rahul Gandhi । कांग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीनंतर अटक केली जाईल, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले आहे. आसाममधील सिबसागर जिल्ह्यातील नाझिरा येथे एका कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर हिमंता बिस्वा सरमा बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, आम्ही एफआयआर नोंदवला आहे. विशेष तपास पथक तपास करेल आणि लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना (राहुल गांधी) अटक केली जाईल. आता असे केले तर काँग्रेस याला राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई म्हणेल.

आसामच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

कधीकाळी काँग्रेसमध्ये असणाऱ्या हिमंता बिस्वा सरमा यांनी मागील काही महिन्यांपासून काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ते सातत्याने हिंदुत्वाचा दाखला देत काँग्रेसला लक्ष्य करतात. मंगळवारी पोलिसांनी स्वत:हून दखल घेत भारत जोडो यात्रेदरम्यान हिंसाचार भडकवल्याबद्दल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या इतर नेत्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.

या प्रकरणी आसामचे पोलीस महासंचालक जीपी सिंग यांनी सांगितले की, अतिरिक्त पोलीस महासंचालक यांनी स्थापन केलेल्या एसआयटीमार्फत कसून तपास करण्यासाठी हे प्रकरण आसाम सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहे. काँग्रेस नेते आणि समर्थक आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार होते, मात्र त्यांना गुवाहाटीमध्ये रोखण्यात आले.

Rahul Gandhi यांना अटक होणार – सिरमा

कांग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी गुवाहाटीच्या मुख्य रस्त्यांवर प्रवेश करू नये यासाठी लावलेले बॅरिकेड्स हटवले होते. यावेळी त्यांची पोलिसांशी झटापट झाली. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष झाला होता. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भूपेन बोरा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया यावेळी जखमी झाले.

काँग्रेस समर्थकांना थांबवल्यावरून राहुल गांधी म्हणाले होते की, काँग्रेसच्या लोकांनी बॅरिकेड्स हटवले आहेत, पण आम्ही कायदा मोडणार नाही. तर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले होते की, मी या प्रकरणी एफआयआर नोंदवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस योग्य ती कारवाई करतील.

दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सिरमा हे भाजपातील हिंदुत्वाचा मोठा चेहरा असल्याचे मानले जाते. ते अनेकदा काँग्रेसवर बोचरी टीका करताना दिसले आहेत. कधीकाळी राहुल गांधींचे जवळचे सहकारी असलेला सिरमा आता त्यांच्या अटकेची भाषा करत आहेत. यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

News Title- Assam Chief Minister Himanta Biswa Sarma said that Congress Rahul Gandhi will be arrested after the Lok Sabha elections
 महत्त्वाच्या बातम्या –

Kangana Ranaut हुबेहुब इंदिरा गांधींसारखी दिसते; ‘Emergency’ मधील झलक, रिलीज डेट जाहीर

संदीप राऊत हाजीर हो…! Sanjay Raut यांच्या भावाला ईडीची नोटीस; प्रकरण काय?

ACB ची मोठी कारवाई! सरकारी अधिकाऱ्याकडे सापडली 100 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता

IND vs ENG | विराटच्या जागी युवा खेळाडूला संधी; रहाणे-पुजारा यांना पुन्हा एकदा वगळलं

मुख्यमंत्री Eknath Shinde शेतीत रमले; हातात कुदळ अन् टॅक्टरचं स्टेअरिंग, पाहा फोटो