Alia Bhatt च्या साडीवर ‘रामायण’, रणबीर कपूरच्या शालची किंमत लाखोच्या घरात

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Alia Bhatt | सोमवारी विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामललाचा अभिषेक सोहळा पार पडला. बॉलिवूड कलाकारांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली होती. आलिया भट्टने 22 जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी खास साडी परिधान केली होती. यावेळी तिची साडी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. आलियासोबत तिचा पती रणबीर कपूरही या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरला.

राम मंदिराच्या कार्यक्रमात आलिया-रणबीरची चर्चा

राम मंदिराच्या कार्यक्रमातील रणबीर आणि आलिया यांच्या पारंपारिक लूकची खूप प्रशंसा झाली. आलियाने निळ्या रंगाच्या साडीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर धोती कुर्ता लूकमध्ये रणबीर दिसला. आलिया भट्टने तिच्या साडीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. तिची रामायण थीम असलेली साडी सोशल मीडियावर चर्चेत राहिली. खरं तर रणबीर कपूरची पश्मीना शाल आलियाच्या साडीपेक्षा कितीतरी पटीने जास्त मौल्यवान होती.

आलिया आणि रणबीरचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आलियाचा साडीतील फोटो शेअर करून चाहते तिचे कौतुक करत आहेत. अभिनेत्रीच्या साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच आलियाने मॅचिंग कलरच्या शालने तिचा लूक पूर्ण केला. वेणी स्टाईलच्या घट्ट केसांचा बन आणि नो मेकअप लूकमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती.

Alia Bhatt च्या साडीवर ‘रामायण’

आलिया भट्टची स्टायलिश साडी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी अभिनेत्रीच्या साडीचे फोटो शेअर करताना तिच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिली आहे. अभिनेत्रीच्या साडीच्या बॉर्डरवर ‘रामायण’च्या संपूर्ण कथेची झलक पाहायला मिळते. विशेष म्हणजे ही साडी बनवण्यासाठी 100 तास मेहनत घेण्यात आली, जिची किंमत 45 हजार रुपये आहे. या साडीवर सलग 10 दिवस काम करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ami Patel (@stylebyami)

 

दरम्यान, आलिया भट्टच्या साडीशिवाय रणबीर कपूरचा धोती कुर्ता लूक देखील चर्चेत राहिला. आलियाच्या साडीने लोकांचे लक्ष वेधले तर रणबीरची शाल आकर्षणाचा विषय ठरली. कारण या शालची किंमत लाखोच्या घरात आहे. रणबीर कपूरच्या धोती कुर्ता लूकनेही चाहत्यांची मने जिंकली.

रणबीरने राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी धोती कुर्ता परिधान केला होता आणि त्यावर पश्मीना शाल त्याचे सौंदर्य वाढवत होती. या शालेवर केलेली कारागिरी पाहून चाहते प्रभावित झाले. रणबीरने घातलेली शाल आलियाच्या साडीपेक्षा खूपच महाग आहे. या एका शालीची किंमत सुमारे 1 लाख 7 हजार रुपये आहे.

News Title- Alia Bhatt and Ranbir Kapoor’s outfits at the inauguration of the Ram temple grabbed everyone’s attention
महत्त्वाच्या बातम्या –

लोकसभा निवडणुकीनंतर Rahul Gandhi यांना अटक होणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Kangana Ranaut हुबेहुब इंदिरा गांधींसारखी दिसते; ‘Emergency’ मधील झलक, रिलीज डेट जाहीर

संदीप राऊत हाजीर हो…! Sanjay Raut यांच्या भावाला ईडीची नोटीस; प्रकरण काय?

ACB ची मोठी कारवाई! सरकारी अधिकाऱ्याकडे सापडली 100 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता

IND vs ENG | विराटच्या जागी युवा खेळाडूला संधी; रहाणे-पुजारा यांना पुन्हा एकदा वगळलं