Mary Kom | मेरी कॉमच्या घोषणेनं देशभरात खळबळ, अखेर स्वतःच पुढे येऊन केला मोठा खुलासा !

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mary Kom | आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनच्या नियमामुळे आपण निवृत्ती घेतोय, अशी घोषणा केल्यानंतर भारतीय बॉक्सर मेरी कॉमने आता पुन्हा एकदा मोठा खुलासा केला आहे. तिने माझे विधान मिडियाने तोडून-मोडून सांगितल्याचा आरोप करत निवृत्तीच्या बातम्यांना चुकीचे ठरवले आहे. मी अद्याप असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे मेरी कॉमने (Mary Kom ) स्पष्ट केले आहे.

मेरी कॉमने केला मोठा खुलासा

‘मी जेव्हा कधी निवृत्तीची घोषणा करेल तेव्हा मीडियाला बोलवून सर्व काही सांगेल. आता सध्या मी असा कोणताही निर्णय घेतला नाही.’, असे मेरी कॉम म्हणाली आहे. त्यामुळे सध्या तरी मेरी कॉमने (Mary Kom ) निवृत्ती घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

“24 जानेवारी रोजी दिब्रुगढमधील एका शाळेत मी मुलांना प्रेरित करण्यासाठी म्हणाले होते की, मला अजूनही खेळाची भूक आहे, परंतु वयाच्या मर्यादेमुळे मी ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकत नाही. मात्र, मला यात सहभागी व्हायचे नाही… मी माझ्या फिटनेसवर खूप मेहनत घेत असल्याचे मी म्हणाले होते. सध्या तरी मी माझी निवृत्ती जाहीर केलेली नाही. जेव्हा मी माझ्या निवृत्तीची घोषणा करेन, तेव्हा मी स्वतः मिडियासमोर हजर राहीन.”, असा खुलासा मेरी कॉमने केला आहे.

त्यामुळे मेरी कॉमने आपल्या निवृत्तीच्या घोषणा फेटाळून लावल्या आहेत. आज (25 जानेवारी) सकाळपासूनच मिडियामध्ये मेरीने खेळाचे मैदान सोडल्याच्या झळकत होत्या. या माहितीमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. मात्र, मेरीने ही माहिती चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मेरीच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

‘त्या’ विधानामुळे चर्चांना उधान

“मला अजूनही खेळण्याची भूक आहे.पण, दुर्दैवाने वयोमर्यादा ओलांडल्यामुळे मी कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. मला आणखी खेळायचे आहे पण मला (वयोमर्यादेमुळे) मैदान सोडण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे मला निवृत्ती घ्यावी लागली आहे. मी माझ्या आयुष्यात सर्वकाही मिळवले आहे.”, असे विधान मेरी कॉमने (Mary Kom ) दिब्रुगढमधील एका शाळेतील कार्यक्रमात केले होते. यानंतर तिच्या निवृत्तीच्या चर्चांना उधान आल्याचे दिसून आले.

IBA च्या नियमानुसार, 40 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या एथलीट्सना व्यावसायिक बॉक्सिंग टुर्नामेंटमध्ये खेळण्याची परवानगी मिळत नाही. मेरी कॉम सध्या 41 वर्षांची असल्याने तिला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.याच कारणामुळे तिच्या निवृत्तीच्या चर्चा झाल्या.

News Title- Mary Kom denied retirement announcements

महत्त्वाच्या बातम्या –

Alia Bhatt च्या साडीवर ‘रामायण’, रणबीर कपूरच्या शालची किंमत लाखोच्या घरात

लोकसभा निवडणुकीनंतर Rahul Gandhi यांना अटक होणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Kangana Ranaut हुबेहुब इंदिरा गांधींसारखी दिसते; ‘Emergency’ मधील झलक, रिलीज डेट जाहीर

संदीप राऊत हाजीर हो…! Sanjay Raut यांच्या भावाला ईडीची नोटीस; प्रकरण काय?

ACB ची मोठी कारवाई! सरकारी अधिकाऱ्याकडे सापडली 100 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता