Padma Awards 2024 | भारताच्या प्राचीन खेळाला शिखरावर नेणाऱ्या देशपांडे ‘गुरूं’ना पद्म पुरस्कार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Padma Awards 2024 | 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षीप्रमाणे भारत सरकारने यावेळी देखील पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावेळी एकूण 132 जणांना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत. (Padma Awards 2024 ) त्यापैकी एक क्रीडा व्यक्तिमत्व आहे, ज्याने अनेक वर्षांपासून भारताच्या प्राचीन खेळाला शिखरावर नेण्यासाठी गुरूची भूमिका बजावली. मलखांबचे गुरु उदय विश्वनाथ देशपांडे यांना मोदी सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

उदय देशपांडे ‘गुरूं’ना पद्म पुरस्कार

मलखांब हा भारताचा प्राचीन खेळ आहे. मलखांब भारतीय संस्कृतीचा जुना खेळ आहे, ज्याला नव्या उंचीवर नेण्यामध्ये उदय विश्वनाथ देशपांडे यांचे मोठे योगदान आहे. कारण देशपांडे यांनी मागील काही दशके या खेळाला नव्या उंचीवर पोहचवण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांच्या मार्गदर्शनातच भारतीय शिलेदारांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या प्राचीन खेळात यश मिळवले.

भारत सरकारने 70 वर्षीय उदय विश्वनाथ देशपांडे यांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे. महाराष्ट्रातील असलेले उदय हे मलखांबचे गुरू आहेत आणि हजारो तरुणांना धडे देण्याचे काम ते करतात. उदय विश्वनाथ देशपांडे यांनी भारतीय संस्कृतीचा हा जुना खेळ तरुणांमध्ये लोकप्रिय करण्यात आणि याचा वारसा पुढे नेण्यात दिलेल्या योगदानामुळे मोदी सरकारने त्यांचा गौरव केला आहे.

Padma Awards 2024 जाहीर

उदय विश्वनाथ यांनी जगातील सुमारे 50 देशांतील 5 हजारांहून अधिक तरुणांना या खेळाच्या युक्त्या शिकवल्या आहेत. या काळात त्यांनी केवळ तरुणांनाच नव्हे तर महिला, अनाथ, अपंग, ज्येष्ठ नागरिकांनाही या खेळाचे प्रशिक्षण दिले आहे. सध्या उदय हे जागतिक मलखांब महासंघाचे संचालक देखील आहेत. या माध्यमातून ते वेगवेगळ्या देशांमध्ये या खेळाचा प्रचार करतात.

दरम्यान, सर्वांना या खेळाची माहिती व्हावी या उद्देशाने त्यांनी पुढाकार घेऊन या खेळाशी संबंधित एक पुस्तक लिहिले आहे. यामध्ये स्पर्धा आणि निर्णयांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या नियम पुस्तकाला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेनेही मान्यता दिली आहे. मलखांब हा भारताचा प्राचीन खेळ आहे, ज्याचा ऑलिम्पिकमध्येही समावेश करण्यात आला आहे.

पद्म पुरस्कार पटकावणारे क्रीडा विश्वातील शिलेदार

रोहन बोपण्णा – कर्नाटक
जे. चिन्नापा – तामिळनाडू
उदय विश्वनाथ देशपांडे – महाराष्ट्र
गौरव खन्ना – उत्तर प्रदेश
सतेंद्रसिंग लोहिया – मध्य प्रदेश
पूर्णिमा महतो – झारखंड
हरबिंदर सिंग – दिल्ली

News Title- Uday Vishwanath Deshpande, coach of India’s ancient sport of Malkhamb, has been honored with the Padma Award
 महत्त्वाच्या बातम्या –

Salman Khan | सलमानने शब्द पाळला! ‘त्या’ मुलीला दिलेलं वचन केलं पूर्ण

Parineeti Chopra | लग्नानंतर अभिनेत्री परिणीती चोप्राने घेतला मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली…

Mary Kom | मेरी कॉमच्या घोषणेनं देशभरात खळबळ, अखेर स्वतःच पुढे येऊन केला मोठा खुलासा !

Anil Kapoor | ..अन् प्रसिद्ध अभिनेता ढसाढसाच रडला; त्या कार्यक्रमात असं नेमकं काय घडलं?

Bigg Boss 17 | कोण ठरणार ‘बिग बॉस’चा विजेता?, ‘या’ दोन स्पर्धकांमध्ये होणार फिनालेसाठी चुरस!