Lok Sabha Election 2024 । आगामी काळात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. लोकसभेची ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची असणार आहे. सत्ताधारी भाजप नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विजयाची हॅटट्रिक मारण्याच्या तयारीत आहे. तर विरोधी पक्ष आघाड्या करून भाजपला रोखण्याची तयारी करत आहेत. मात्र, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आगामी निवडणूक लढणार का? असे विचारले असता भाजप उपाध्यक्षांनी सूचक विधान केले आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीची चाहूल आतापासूनच लागू लागली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा (Mandi Lok Sabha Seat) जागा चर्चेत आहे. इथून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत राजकीय कारकीर्द सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अलीकडेच खुद्द कंगनाने या चर्चांना पूर्णविराम दिला होता. पण आता मध्य प्रदेश भाजप उपाध्यक्षांनी सूचक विधान केले.
भाजप उपाध्यक्षांचं सूचक विधान
भाजप उपाध्यक्ष गोविंद ठाकूर हे एका मंदिराच्या वार्षिक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. यादरम्यान माजी मंत्री गोविंद सिंह ठाकूर म्हणाले की, हिमाचल प्रदेश सरकारचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री विक्रमादित्य सिंह आपल्या भूमिकेवर ठाम राहिले नाहीत. कधी विक्रमादित्य सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे आभार मानतात तर कधी आपले वक्तव्य मागे घेतात त्यांची दुटप्पी भूमिका असते.
त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आगामी लोकसभा निवडणूक, राम मंदिर आणि भाजपची रणनीती याबद्दल त्यांनी मत मांडले. प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी सांगितले की, विक्रमादित्य सिंह यांनाही अयोध्येतील रामलला प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. या निमंत्रणासाठी त्यांनी प्रथम पंतप्रधान आणि आरएसएसचे आभार मानले, पण नंतर त्यांनी पलटी घेतली.
Lok Sabha Election 2024 कंगना लोकसभा लढणार?
तसेच त्यांनी यावेळी काँग्रेस सरकारवर जोरदार निशाणा साधला. गोविंद ठाकूर म्हणाले की, सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेस सरकारने जनतेला 10 आश्वासने दिली होती. मात्र एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. काँग्रेस बेरोजगार तरुणांना न्याय देऊ शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधारी काँग्रेसला लक्ष्य केले.
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याबद्दल भाजप उपाध्यक्षांनीही आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कंगनाने भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणे ही अंतर्गत बाब आहे आणि पक्ष तिला तिकीट देईल की नाही हे फक्त भाजपचे वरिष्ठ ठरवू शकतात. खरं तर कंगना मंडी जिल्ह्यातील भांबला येथील रहिवासी आहे आणि तिने इथे घर देखील बांधले आहे.
News Title- BJP has reacted on whether Bollywood actress Kangana Ranaut will contest elections from Mandi Lok Sabha constituency in Himachal Pradesh
महत्त्वाच्या बातम्या –
Virat Kohli चा ICC कडून मोठा सन्मान; असे करणारा जगातील पहिला खेळाडू
Padma Awards 2024 | भारताच्या प्राचीन खेळाला शिखरावर नेणाऱ्या देशपांडे ‘गुरूं’ना पद्म पुरस्कार
Bihar Politics | बिहारमध्ये नाट्यमय घडामोडी! नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर
Republic Day | सर्वत्र प्रजासत्ताक दिनाचा उत्साह; कर्तव्य पथावर ‘नारी शक्ती’ची झलक, जाणून घ्या!
Salman Khan | सलमानने शब्द पाळला! ‘त्या’ मुलीला दिलेलं वचन केलं पूर्ण