Padma awards 2024 | पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ मान्यवरांचा होणार सन्मान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Padma awards 2024 | 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी (Padma awards 2024) जाहीर केली आहे. 1954 सालापासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 जानेवारीला निवड झालेल्या व्यक्तींची नावे जाहीर केली जातात.

पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यांची नावे- (एकूण 5 पुरस्कार)

वैजयंतीमाला माला (कला क्षेत्र/ तमिळनाडू)
के. चिरंजीवी (कला क्षेत्र / आंध्र प्रदेश)
एम. व्यंकय्या नायडू (माजी उप राष्ट्रपति) (राजकीय नेते / आंध्र प्रदेश)
बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर (समाजसेवा / बिहार)
पी. सुब्रह्मण्यम (कला क्षेत्र / तमिळनाडू) अशी एकूण पाच जणांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Padma awards 2024 : पद्मभूषण (एकूण 22 पुरस्कार)

हॉर्मुसजी एन. कामा (साहित्य व पत्रकारिता / महाराष्ट्र)
अश्विन बालचंद मेहता (मेडिसीन / महाराष्ट्र)
राम नाईक (सार्वजनिक व्यवहार / महाराष्ट्र)
दत्तात्रय अंबादास राजदत्त (कला / महाराष्ट्र)
प्यारेलाल शर्मा (कला / महाराष्ट्र)
कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता / महाराष्ट्र)

महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना (Padma awards 2024) या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

पद्मश्री (एकूण 110 पुरस्कार)

उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा / महाराष्ट्र)
मनोहर डोळे (औषध / महाराष्ट्र)
झाकीर आय काझी (साहित्य व शिक्षण / महाराष्ट्र)
चंद्रशेखर मेश्राम (औषध / महाराष्ट्र)
कल्पना मोरपारिया (व्यापार व उद्योग / महाराष्ट्र)
शंकर बाबा पापळकर (समाज सेवा / महाराष्ट्र) पद्मश्री पुरस्कार मध्येही महाराष्ट्रातील 6 मान्यवरांचे नाव सामील झाले आहे.

Padma awards 2024 : ‘असा’ होतो पुरस्कार सोहळा

देशात ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार असाधारण आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो.तर ‘पद्मभूषण’ हा उच्च दर्जाच्या सेवेसाठी आणि ‘पद्मश्री’ हा कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त या पुरस्कारांची घोषणा केली जाते.

या पुरस्कारांचे वितरण भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते केले जाते. दरवर्षी मार्च/एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात हा सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी, 30 पुरस्कार विजेत्यांमध्ये महिला आणि 8 परदेशी/एनआरआय/पीआयओ/ओसीआय श्रेणीतील व्यक्ती आणि 9 मरणोत्तर पुरस्कार विजेत्यांचा समावेश असतो.

News Title-  Padma awards 2024
महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir | डोळे मिचकावताना दिसले रामलला; AI ने बनवला ‘भारी’ व्हिडीओ

Bollywood Actress | अभिनेत्री Kriti Sanon ला यूएई सरकारकडून मोठी ‘भेट’

Lok Sabha Election 2024 । कंगना पक्षातून निवडणूक लढणार? भाजप उपाध्यक्षांचं सूचक विधान

Virat Kohli चा ICC कडून मोठा सन्मान; असे करणारा जगातील पहिला खेळाडू

Padma Awards 2024 | भारताच्या प्राचीन खेळाला शिखरावर नेणाऱ्या देशपांडे ‘गुरूं’ना पद्म पुरस्कार