Republic Day 2024 | प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान, ‘हे’ पहिल्यांदाच घडलं

Republic Day 2024 | भारत आज आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सगळ्यांची नजर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनावर आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर भारताची सैन्य शक्ती आणि सांस्कृतीक विविधतेच प्रदर्शन केलं जाईल.

भारतीय प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव

भारतीय प्रजासत्ताकाचा आज अमृत महोत्सव आहे. कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन प्रमुख अतिथी आहेत. तसेच या परेडसाठी पहिल्यांदाच देशातील 1500 शेतकरी विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित आहेत.

Republic Day 2024 | परेडसाठी 1500 शेतकरी विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित

हा सोहळा अधिक खास बनवण्यासाठी यावेळी अन्नदात्यांचाही समावेश करण्याची तयारी करण्यात आली आहे. याअंतर्गत देशभरातील 1500 हून अधिक शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय.

सर्व 1500 हून अधिक शेतकरी दिल्ली येथे आयोजित 75 व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचा भाग असतील आणि 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होतील. यामध्ये देशाच्या विविध भागांतील कृषी आणि मत्स्यव्यवसायाशी निगडित शेतकऱ्यांचा समावेश आहे.

या विशेष कार्यक्रमात केंद्र सरकारच्या विविध कृषी आणि शेतकरी कल्याणकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने केलेल्या पोस्टनुसार, लाभ मिळाला आहे आणि जे शेतकरी शेतकरी उत्पादक गटात सामील होऊन नफा मिळवत आहेत.

दरम्यान, राजधानी दिल्लीतील राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतातील विविध संस्कृतीचं दर्शन घडतंय. तसेच कर्तव्य पथ येथे परेड कमांडर भुवनेश कुमार यांच्या नेतृत्वात संचलनाला सुरूवात झाली आहे. 75व्या प्रजासत्ताक दिनाचे नेतृत्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार आहेत. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Manoj Jarange | मराठा आरक्षणावर राज्यपालांचं महत्वाचं वक्तव्य!

Padma awards 2024 | पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ मान्यवरांचा होणार सन्मान

Ram Mandir | डोळे मिचकावताना दिसले रामलला; AI ने बनवला ‘भारी’ व्हिडीओ

Bollywood Actress | अभिनेत्री Kriti Sanon ला यूएई सरकारकडून मोठी ‘भेट’

Lok Sabha Election 2024 । कंगना पक्षातून निवडणूक लढणार? भाजप उपाध्यक्षांचं सूचक विधान