Manoj Jarange | मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; जरांगेंच्या मागण्या मान्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्य शिष्टमंडळाची बैठक पार पडली आहे. मनोज जरांगे यांच्यासोबत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाल्याचं कळतंय. जरांगे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

जरांगेंच्या मागण्या मान्य- दीपक केसरकर

या बैठकीमध्ये जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यासोबत मराठा आरक्षणा संदर्भात चर्चा करण्यात आली. मात्र त्याआधीमनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मान्य झाल्या आहेत, शासकीय विहित नियम असतात त्यानुसार अंमलबजावणी होईल, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. सरकारच्या शिष्टमंडळाने आज जरांगे यांच्याशी यशस्वी चर्चा केली. त्यानंतर ही माहिती देण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघाले होते. मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरु करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता. आता आरक्षणाचा गुलाल घेऊनच मुंबई सोडणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

जरांगे 2 वाजता भूमिका स्पष्ट करणार

आवाज येत नसल्यामुळे मनोज जरांगेंनी एक तास संभाषण थांबण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत साऊंड सिस्टिम उभी करण्यात येणार आहे. दोन वाजता सभा होणार आहे. कुणामध्येही गैरसमज होऊ नये. सरकारसोबत चर्चा झालेली माहिती सर्वांना सांगणं गरजेचं आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचा लढा आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. आज दुपारीच 2 वाजता मनोज जरांगे पाटील आपली निर्णायक भूमिका स्पष्ट करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Manoj Jarange | सरकारचा जीआर घेऊन जरांगेंच्या भेटीसाठी आलेल्या मंगेश चिवटेंना भोवळ

Republic Day 2024 | प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान, ‘हे’ पहिल्यांदाच घडलं

Manoj Jarange | मराठा आरक्षणावर राज्यपालांचं महत्वाचं वक्तव्य!

Padma awards 2024 | पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ मान्यवरांचा होणार सन्मान

Ram Mandir | डोळे मिचकावताना दिसले रामलला; AI ने बनवला ‘भारी’ व्हिडीओ