Manoj Jarange Patil | आझाद मैदानावर जाण्यावर मनोज जरांगे ठाम; सर्वांना सरकारचा जीआर वाचून दाखवणार

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलाय. त्यांच्या सोबत मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेले हजारो आंदोलक आहेत. वाशीमध्येच आंदोलन मागे घेण्याबाबत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना विनंती केली आहे. पण मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत.

मुंबईत धडकी भरण्यास सुरवात

आझाद मैदानात जाऊन घोषणा करण्याबाबत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) ठाम आहेत. थोड्याच वेळात मनोज जरांगे आपली भूमिका घेतात, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून पाच ते सहा अध्यादेश काढण्यात आले आहेत. शिष्टमंडळाची मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

“आझाद मैदानावर सरकारचा जीआर वाचून दाखवणार”

सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण साऊंड सिस्टिमचा खोळंबा झाल्याने त्यांनी दुपारी 2 वाजता सर्वांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा जीआर वाचून दाखवायचा आहे. प्रत्येक शब्द समाजाला कळला पाहिजे, असं मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणालेत.

सरकारने काढलेला जीआर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना दाखवण्यात आला आहे. त्यावर मनोज जरांगे यांचं समाधान झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मनोज जरांगे आज त्यावर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मराठा आरक्षण मागणीसाठी वाशी मध्ये जमलेल्या लाखो जनसमुदायाने मुंबईच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला तर मोठ्या प्रमाणामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वाशी टोल नाका येथे रॅपिड ऍक्शन फोर्स ची टीम दाखल झाली आहे. या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल स्थानिक वाहतूक पोलीस नवी मुंबई पोलीस दाखल झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Manoj Jarange | “झोपेत असताना पोलिसांनी..”; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

Manoj Jarange | मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; जरांगेंच्या मागण्या मान्य

Manoj Jarange | सरकारचा जीआर घेऊन जरांगेंच्या भेटीसाठी आलेल्या मंगेश चिवटेंना भोवळ

Republic Day 2024 | प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान, ‘हे’ पहिल्यांदाच घडलं

Manoj Jarange | मराठा आरक्षणावर राज्यपालांचं महत्वाचं वक्तव्य!