Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय अखेर जाहीर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील बोलायला सुरुवात…

शासनाचं शिष्टमंडळ आलं होतं त्यांच्यासोबत चर्चा झाली

मंत्री कुणी आले नव्हते, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव आले होते

आपली भूमिका तुमच्यासमोर आधी सांगतो….

54 लाख नोंदी सापडल्या त्या नोदींचे कागद ग्रामपंचायतला चिटकवा आणि शिबीरं घ्या, ही मागणी होती

त्यांनी सांगितलं, आपण इकडं निघाल्यापासून शिबीरं सुरु केली आणि नोंदी ग्रामपंचायतला लावायला सुरुवात केलीय

कायदा सांगतो, नोंदी मिळाल्या त्याच्या संपूर्ण परिवाराला लाभ मिळावा… 54 लाख नोंदी मिळाल्या एकावर पाच जणांना जरी फायदा झाला तरी 2 कोटी मराठ्यांना फायदा मिळतो.

ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांनी अर्ज करायला सुरुवात करा. 4 दिवसात प्रमाणपत्र देण्याची मागणी आपण केलीय.

54 लाख नाहीतर आता 57 लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत. त्यानी आता असं सांगितलंय की 37 लाख मराठ्यांना प्रमाणपत्र दिलंय. मी यादी घेतलीय त्यांच्याकडून… मी सगळ्यांना WhatsApp वर टाकतो ती यादी…

10-15 लाख मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायचे राहिलेत, ते लवकरच देणार आहेत. कोणाला दिलंय त्याचा डाटा सुद्धा आपण मागितला आहे. हे जर आम्ही आंतरवलीला होतो तेव्हा सांगितलं असतं तर जमलं नसतं का?

शिंदे समिती रद्द करायची नाही. या समितीनं काम करत रहायचं आणि नवीन नोंदी सापडायचं काम करायचं. सरकारनं या समितीची मुदत दोन महिने वाढवली आपली मागणी एक वर्षे वाढवली.

ज्यांची नोंद मिळाली त्यांच्या सग्यासोयऱ्यांना देखील प्रमाणपत्र द्यायची, याचा अध्यादेश काढा… सग्यासोयऱ्यांनी शपथपत्र द्यायचं, त्याच्यावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं तो जर खोटा पाव्हणा असला तर त्याची चौकशी करा. शंभर रुपयांच्या प्रमाणपत्रावर हे शपथपत्र द्यायचं होतं ते मोफत करा अशी आमची मागणी होती ती मान्य केलीय त्यांनी…

आंतरवलीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्यायचे… गृह विभागाने विहीत प्रक्रिया राबवून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया चालू केलीय. मात्र त्याचं पत्र नाहीये, हे पत्र देण्याची आमची मागणी आहे.

मराठा समाजाला शिक्षणात शंभर टक्के मोफत शिक्षण करण्यात यावं. सरसकट मराठा आरक्षण मिळेपर्यंत नोकऱ्यांमध्ये सरकारी भरत्या करायच्या नाहीत. करायच्या असतील तर आमच्या जागा रिकाम्या ठेवून करा.

सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश काढेपर्यंत मी हवं तर इथं थांबतो. आझाद मैदानात जाणार नाही, पण तो अध्यादेश लवकरात लवकर काढा. उद्या 11-12 वाजेपर्यंत वाट पाहणार नाहीतर आझाद मैदानावर जाणार.

 

(बातमी अपडेट होत आहे, थोड्या वेळात रिफ्रेश करा)

ay 2024 | प्रजासत्ताक दिनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची भारतीय विद्यार्थ्यांसाठी सर्वांत मोठी घोषणा!

Manoj Jarange Patil | आझाद मैदानावर जाण्यावर मनोज जरांगे ठाम; सर्वांना सरकारचा जीआर वाचून दाखवणार

Manoj Jarange | “झोपेत असताना पोलिसांनी..”; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

Manoj Jarange | मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; जरांगेंच्या मागण्या मान्य

Manoj Jarange | सरकारचा जीआर घेऊन जरांगेंच्या भेटीसाठी आलेल्या मंगेश चिवटेंना भोवळ