Padma Award 2024 for Sports | क्रीडा विश्वातील ‘या’ सात शिलेदारांचा होणार सर्वोच्च सन्मान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Padma Award 2024 for Sports | आज (26 जानेवारी) संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच म्हणजेच 25 जानेवारी रोजी भारत सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, अभिनय, वैद्यक, समाजसेवा आणि सार्वजनिक घडामोडी या क्षेत्रातील 132 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यात क्रीडा विश्वातील सात शिलेदारांचाही समावेश असून त्याची यादी खालीलप्रमाणे दिली आहे.

‘हे’ आहेत क्रीडा विश्वातील सात शिलेदार

रोहन बोपन्ना (टेनिस)- भारताचा (Padma Award 2024 for Sports) टेनिसपटू रोहन बोपण्णाने (Rohan Bopanna) नुकताच इतिहास रचला आहे. पुरुष दुहेरी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा टेनिस इतिहासातील सर्वात वयोवृद्ध खेळाडू ठरला आहे. बोपण्णाला पद्म पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. 43 वर्षीय बोपण्णा ग्रँड स्लॅम ट्रॉफी जिंकणारा चौथा भारतीय आहे. त्याने 2017 मध्ये फ्रेंच ओपनमध्ये कॅनेडियन जोडीदार गॅब्रिएला डब्रोव्स्कीसह मिश्र दुहेरीचे विजेतेपद जिंकले होते.

जोशना च‍िनप्पा (तामिळनाडू)- भारतीय स्क्वॉशपटू जोशना चिनप्पाने ( J. Chinnapa)आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेक पदके जिंकली आहेत. तिने दोन वेळा राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकली आहेत. या व्यतिरिक्त तीने दुहेरीतील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चार पदके जिंकली असून त्यात 2022 मधील सुवर्णपदकाचाही समावेश आहे.

उदय देशपांडे – भारत सरकारने 70 वर्षीय उदय विश्वनाथ देशपांडे (Uday Vishwanath Deshpande) यांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे. महाराष्ट्रातील असलेले उदय हे मलखांबचे गुरू आहेत आणि हजारो तरुणांना धडे देण्याचे काम ते करतात. उदय विश्वनाथ देशपांडे यांनी भारतीय संस्कृतीचा हा जुना खेळ तरुणांमध्ये लोकप्रिय करण्यात आणि याचा वारसा पुढे नेण्यात दिलेल्या योगदानामुळे त्यांचा गौरव केला जात आहे.

गौरव खन्ना (पॅराबैडमिंटन)- गौरव खन्ना (Gaurav Khanna) हे भारतीय (Padma Award 2024 for Sports) पॅरा बॅडमिंटन प्रशिक्षक म्हणून प्रचलित आहेत. ते लखनऊ येथील रहिवासी असून त्यांना पद्म पुरस्काराने गौरवीत केले जाणार आहे. 2000 साली एका रोड अॅक्सिडेंटमध्ये दिव्यांग झाल्यानंतर त्यांनी हार मानली नाही. पुन्हा आयुष्यात नवी सुरुवात केत त्यांनी आपली ट्रेनिंग सुरू केली. नंतर 2004 मध्ये त्यांनी स्पेशल चाइल्ड साठी परीक्षण द्यायला सुरुवात केली.

पूर्णिमा महतो- टाटा आर्चरी अकादमीच्या प्रशिक्षक पूर्णिमा महतो (Poornima Mahato) यांना त्यांच्या कामगिरीबद्दल द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता यानंतर त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. झारखंडमधील बिरसानगर येथील गरीब कुटुंबातील असलेल्या पौर्णिमा यांनी आपल्या मेहनतीने तिरंदाजीच्या जगात एक वेगळी ओळख निर्माण केली
आहे.

हरविंदर सिंग- हरविंदर सिंग (Harbinder Singh) हा भारतीय पॅरालिम्पिक तिरंदाजी खेळाडू आहे. त्याने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचत तिरंदाजीमध्ये देशाला पहिले पदक जिंकून दिले आहे.

सतेंद्र सिंह लोहिया- भारतातील ग्वाल्हेरचे जलतरणपटू सत्येंद्र सिंग लोहिया (Satendra Singh Lohia) यांनी आतापर्यंत सात राष्ट्रीय आणि तीन आंतरराष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला असून त्यांनी नॅशनलमध्ये सुमारे 20 पदके जिंकली आहेत. यात पाच सुवर्णपदकांचा समावेश आहे.

News Title- Padma Award 2024 for Sports 

महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir | डोळे मिचकावताना दिसले रामलला; AI ने बनवला ‘भारी’ व्हिडीओ

Bollywood Actress | अभिनेत्री Kriti Sanon ला यूएई सरकारकडून मोठी ‘भेट’

Lok Sabha Election 2024 । कंगना पक्षातून निवडणूक लढणार? भाजप उपाध्यक्षांचं सूचक विधान

Virat Kohli चा ICC कडून मोठा सन्मान; असे करणारा जगातील पहिला खेळाडू

Padma Awards 2024 | भारताच्या प्राचीन खेळाला शिखरावर नेणाऱ्या देशपांडे ‘गुरूं’ना पद्म पुरस्कार