Marath Reservation | मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस प्राशन करून उपोषण सोडलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अविरत सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू होतं.

मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश

आज पहाटे सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे सांगितल्यानंतर मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर थोडा वेळ आराम केल्यानंतर मनोज जरांगे हे सभास्थळी निघाले.

सभेला सुरूवात करण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवरांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सभास्थळी येऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिभन जरांगे पाटलांनी उपोषण सोडले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना गुलाल लावाल, नवा जीआरही सुपूर्द केला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस प्राशन करून उपोषण सोडलं

मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रदीर्घ लढा संपला. गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी , मराठा समाजासाठी सर्वस्व देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या पदरात आरक्षण मिळाल्याने त्यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं. समाजातील सर्वसामान्य व्यक्ती ते मराठा आरक्षणाचे नेते असा मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास संघर्षमय होता.

कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाण पत्र द्यावे तसेच त्यांच्या कुटुंबाना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे ही मागणी मान्य झाली आहे. तसेच सरकारने सगा सोयराबद्दल अध्यादेश काढले आहे. तो मला देण्यात आल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

Padma Award 2024 for Sports | क्रीडा विश्वातील ‘या’ सात शिलेदारांचा होणार सर्वोच्च सन्मान

Manoj Jarange Patil | सगेसोयरे म्हणजे नेमके कोण?, जाणून घ्या मनोज जरांगेंची नेमकी मागणी काय?

Abhishek Bachchan | घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनची पोस्ट, म्हणाला..

Padma awards 2024 | चित्रपटसृष्टीतील ‘या’ कलाकारांचा सर्वोच्च सन्मान; पाहा यादी

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रातील बड्या मंत्र्याने केलं मोठं वक्तव्य!