Abhishek Bachchan | अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहेत. ऐश्वर्या अभिषेकपासून दूर राहतेय असंही म्हटलं जात आहे. तर काही दिवसांपूर्वीच सासू जया बच्चन आणि नणंद श्वेता बच्चन या दोघींनी ऐश्वर्यावर आरोप केले होते.
तर, या चर्चेदरम्यानच ऐश्वर्या पती अभिषेकसोबत टीम जयपूर पिंक पँथर्ससाठी सपोर्ट करताना दिसून आली होती. जयपूर पिंक पँथर्सची झालेल्या या सामन्यात ऐश्वर्या सासरा अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसून आली होती. त्यामुळे नेमकं यांच्यात चाललंय तरी काय, याबाबत सर्वच जण बुचकळ्यात पडले आहेत. अशातच आता अभिषेक बच्चन याने केलेल्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा यांच्यात बिनसल्याच्या चर्चा होत आहेत.
Abhishek Bachchan ची पोस्ट
ऐश्वर्याचा नवरा अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan ) गुरुवारी (25 जानेवारी) त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. रोजी त्याने आनंद चुलानी यांनी लिहिलेल्या काही ओळी त्याने शेअर केल्या. या पोस्टमध्ये अभिषेकने आयुष्यातील अपयशांबद्दल स्पष्टपणे बोलून दाखवले.
“अपयशाची भीती तुमची स्वप्ने नष्ट करेल. अपयशातून धडा घेतल्यास तुमची स्वप्ने पूर्ण होतील”, अशा आशयाची पोस्ट अभिषेकने केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. आता त्याने पोस्टमधून नेमका कुणाकडे निशाणा साधला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र सोशल मीडियावर त्याने ऐश्वर्यासाठीच पोस्ट केल्याचं म्हटलं जात आहे.
ऐश्वर्या-अभिषेक घटस्फोट घेणार?
अनेक दिवसांपासून नेटकऱ्यांना आणि चाहत्यांना ऐश्वर्या आणि अभिषेक (Abhishek Bachchan) यांचा खरोखर घटस्फोट होणार का? असा प्रश्न पडत आहे. या दोघांना देखील घटस्फोटाबाबत कायम प्रश्न विचारण्यात येत आहे. मात्र अजूनही ऐश्वर्या आणि अभिषेक किंवा बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी याबाबत अधिकृत असं कोणतंच भाष्य केलं नाही.
ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंब अनेक कार्यक्रमांना एकत्रित उपस्थित राहत असतात. त्यातच काही दिवसांपुर्वी ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, लेक आराध्या बच्चन, अमिताभ बच्चन हे सगळे मिळून कबड्डी मॅच पहायला गेले होते. एकीकडे ते एकत्र फिरतात तर दुसरीकडे त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चेमुळे त्यांच्यात नेमकं सगळं काही सुरळित आहे की ते बिनसलंय याबाबत काहीच स्पष्ट झालं नाही.
News Title : Abhishek Bachchan cryptic post
महत्त्वाच्या बातम्या-
Manoj Jarange | मराठा आरक्षणावर राज्यपालांचं महत्वाचं वक्तव्य!
Ram Mandir | डोळे मिचकावताना दिसले रामलला; AI ने बनवला ‘भारी’ व्हिडीओ
Bollywood Actress | अभिनेत्री Kriti Sanon ला यूएई सरकारकडून मोठी ‘भेट’
Lok Sabha Election 2024 । कंगना पक्षातून निवडणूक लढणार? भाजप उपाध्यक्षांचं सूचक विधान