Padma awards 2024 | चित्रपटसृष्टीतील ‘या’ कलाकारांचा सर्वोच्च सन्मान; पाहा यादी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Padma awards 2024 | भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, अभिनय, वैद्यक, समाजसेवा आणि सार्वजनिक घडामोडी या क्षेत्रातील व्यक्तींना भारतरत्न नंतरचा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान मिळणार आहे.

या यादीत (Padma awards 2024) चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचाही समावेश आहे. 132 पुरस्कार प्राप्तकर्त्यांमध्ये काही कलाकारांचादेखील सन्मान केला जाणार आहे. या पुरस्कारांचे वितरण भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात केले जाते. काल (25 जानेवारीला) निवड झालेल्या व्यक्तींची नावे जाहीर करण्यात आली.

Padma awards 2024 पद्मविभूषण-

वैजयंतीमाला माला- (कला क्षेत्र/ तमिळनाडू) पद्मश्री पुरस्कारप्राप्त वैजयंतीमाला यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. त्यांनी देवदास, नया दौर, आशा, साधना, गंगा जुमना, संगम आणि ज्वेल थीफसह अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘गंवार’ हा होता.

के. चिरंजीवी- (कला क्षेत्र / आंध्र प्रदेश)सुपरस्टार चिरंजीवीने आपल्या कारकिर्दीत 160 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2006 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हा त्यांचा दुसरा पद्म पुरस्कार ठरला. बिंबिसार फेम वसिष्ठ दिग्दर्शित ‘विश्वंभरा’ या चित्रपटात दिसणारा हा अभिनेता एकेकाळी चित्रपटांपासून दूर गेला होता आणि त्याने 2008 मध्ये प्रजा राज्यम पार्टीची स्थापना केली होती.

पद्मा सुब्रमण्यम- (कला क्षेत्र/ तमिळनाडू) भारतीय शास्त्रीय भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात येणार आहे. त्या रिसर्च स्कॉलर, कोरिओग्राफर, संगीतकार, गायिका, शिक्षिका, इंडोलॉजिस्ट आणि लेखिका देखील आहेत. त्या भारताबरोबरच परदेशातही प्रसिद्ध आहेत. जपान, ऑस्ट्रेलिया आणि रशियासारख्या देशांनी त्यांच्या सन्मानार्थ अनेक चित्रपट आणि माहितीपट बनवले आहेत.

Padma awards 2024 पद्मभूषण-

मिथुन चक्रवर्ती- (कला क्षेत्र/ पश्चिम बंगाल) 73 वर्षीय अभिनेते मिथुन हे भारतीय चित्रपटांमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मृगया या चित्रपटातून केली. याच चित्रपटाने त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवून दिला. डिस्को डान्सर, अग्निपथ, घर एक मंदिर, जल्लाद आणि प्यार झुकता नहीं हे त्यांचे इतर हिट चित्रपट आहेत.

उषा उत्थुप- (कला क्षेत्र/ पश्चिम बंगाल)पॉप सिंगर उषा उथुप यांनी 1970 च्या आसपास भारतीय चित्रपटांमध्ये जॅझ संगीत विकसित केले. रंबा हो, वन टू चा चा, शान से, कोई यहाँ नाचे नाचे आणि हरी ओम हरी हे त्यांचे हीट गाणे आहेत.

सुपरस्टार विजयकांत- (कला क्षेत्र/ तमिळनाडू) दिवंगत तामिळ अभिनेते आणि राजकारणी विजयकांत यांना त्यांच्या सेवेसाठी मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डिसेंबर 2023 मध्ये त्यांचे निधन झाले.

Padma awards 2024 पद्मश्री-

नसीमा बानो- (कला क्षेत्र/ उत्तर प्रदेश) नसीम बानो या भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांना नसीम म्हणूनही ओळखले जात असे. तसेच त्यांना “ब्युटी क्वीन” देखील म्हटले जायचे. 1930 च्या मध्यात त्यांनी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली होती.

News Title-  Padma awards 2024 list 

महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir | डोळे मिचकावताना दिसले रामलला; AI ने बनवला ‘भारी’ व्हिडीओ

Bollywood Actress | अभिनेत्री Kriti Sanon ला यूएई सरकारकडून मोठी ‘भेट’

Lok Sabha Election 2024 । कंगना पक्षातून निवडणूक लढणार? भाजप उपाध्यक्षांचं सूचक विधान

Virat Kohli चा ICC कडून मोठा सन्मान; असे करणारा जगातील पहिला खेळाडू

Padma Awards 2024 | भारताच्या प्राचीन खेळाला शिखरावर नेणाऱ्या देशपांडे ‘गुरूं’ना पद्म पुरस्कार