Bigg Boss 17 | फिनालेपूर्वीच ‘बिग बॉस’च्या विजेत्याचा खुलासा?, व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bigg Boss 17 | अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) या शोला लवकरच त्याचा विजेता मिळणार आहे. उद्या म्हणजेच 28 जानेवारीला याचा फिनाले एपिसोड रिलीज होणार आहे. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. यात टॉप 5 मधील तीन स्पर्धक सर्वांत पुढे दिसून येत आहेत.

कुणालाच अपेक्षा नसेल त्या स्पर्धकाला बिग बॉसचा ताज घालण्यात येत असल्याचे या व्हिडिओतून दिसून येत आहे. फिनाले एपिसोडच्या प्रोमोचा हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

‘बिग बॉस’च्या विजेत्याचे नाव आले समोर?

बिग बॉसच्या (Bigg Boss 17) फिनालेमध्ये मुनव्वर फारूकी, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, आणि अरुण माशेट्टी हे टॉप 5 मध्ये सामील झाले आहेत. त्यापैकी मुनव्वर, मन्नारा आणि अभिषेक सर्वांत पुढे दिसत आहेत. हे तिघेही टॉप 3 मध्ये सामील आहेत. रविवारी होणाऱ्या या फिनाले एपिसोडमध्ये पूजा भट्ट, करण कुंद्रा आणि अंकिता लोखंडे यांचे जवळचे लोकही येणार आहेत.

पूजा भट्टने बिग बॉसमधील (Bigg Boss 17) स्पर्धक मन्नारा चोप्राला थेट क्राउन घालून दिले. “मी तुला क्राउनसाठी फिक्स केले आहे. तुझ्या आड अनेक नकारात्मकता आली. पण, तु स्वतः बाबतीत जेवढा विचार करतेस त्यापेक्षाही अधिक तु स्ट्रॉंग आहेस.”, असं पूजा भट्ट म्हणाली आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’चा विजेता मन्नारा चोप्राच असल्याचं आता म्हटलं जात आहे.

तर, दुसरीकडे करण कुंद्रा मुनव्वर फारुकीला सपोर्ट करताना दिसून आला. तुझ्याकडून चुका झाल्या, तु त्या चुका स्वीकारल्यास आणि माफीही मागितली. आपण सर्व मानव आहोत. सर्वांकडून चुका होत असतात. तुझा प्रवास शानदार होता, असं करण कुंद्रा म्हणाला आहे. फिनाले प्रोमोच्या एपिसोडमध्ये याची एक झलक दाखवण्यात आली आहे. त्यामुळे बिग बॉसची ट्रॉफी आता मन्नाराला मिळणार की मूनव्वरला याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

फिनाले प्रोमो बघून चाहत्यांना मोठा धक्का

फिनाले प्रोमोमध्ये (Bigg Boss 17) पूजा भट्टने मन्नारा चोप्राला क्राउन घातल्याने आता ती ट्रोल होत आहे. ‘मूनव्वरच जिंकणार आहे, पूजा भट्टकडून काहीच नाही होऊ शकत.’, अशी प्रतिक्रिया एका युजरने केली आहे. तर, दुसऱ्याने म्हटले की, पूजा भट्ट इथेही नेपोटीजम करतीये.’ काही जणांनी तर पूजाला सपोर्ट केलं आहे.

News Title :  Bigg Boss 17 winner revealed before the finale

महत्वाच्या बातम्या- 

Maratha Reservation | सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य; छगन भुजबळांनी घेतला मोठा निर्णय

Maratha reservation GR | ‘…तरच मिळणार कुणबी प्रमाणपत्र’; जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?

Manoj Jarange | मुख्यमंत्र्यांसमोरच मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य!

Maratha Reservation | मराठा आरक्षणाची लढाई संपली नाही?; घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य

Maratha Reservation | जरांगे पाटील यांच्या भाषणातील पाच प्रमुख मुद्दे, वाचा एकाच ठिकाणी