Rohan Bopanna | भारतीय टेनिस स्टार रोहन बोपन्नाने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे. त्याने मॅथ्यू एबडेनसोबत पुरूष दुहेरीच्या अंतिम सामन्यात इटलीच्या सिमोन बोलेली आणि अँड्रिया वावासोरी यांचा 7-6 (7-0), 7-5 असा पराभव केला. यासह रोहन बोपन्ना ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. वयाच्या 43 व्या वर्षी त्याने ही सोनेरी कामगिरी केली. त्याच्या कारकिर्दीतील हे दुसरे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.
रोहनची ऐतिहासिक कामगिरी
रोहनच्या या विजयाने प्रत्येक देशवासीयाला आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध क्षेत्रातील नामांकितांनी रोहनच्या खेळीला दाद दिली. तसेच त्याचे अभिनंदन केले. बोपन्नाने 2024 ची सुरूवात चांगली केली. या आठवड्याच्या सुरुवातीला त्याने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीतील 500 वा विजय संपादन केला. पद्मश्री जिंकल्यानंतर बोपन्नाचा आनंद द्विगुणित झाला आणि त्यानंतर तो मेलबर्न पार्कमध्ये अव्वल राहिला.
ग्रँड स्लॅम जिंकल्यानंतर बोपन्नाने सांगितले की, आतापर्यंतच्या प्रवासात खूप गोष्टी झाल्या. 500 वा विजय, पहिला क्रमांक पटकावणे, पद्मश्री जिंकणे आणि आता हे ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न सत्यात उतरले. यापेक्षा चांगले काहीही नाही. खूप गोष्टी झाल्या. 500 वा विजय अन् पहिल्या क्रमांकावर पोहोचणे, पद्मश्री जिंकणे आणि आता… हे स्वप्न आहे. यापेक्षा चांगले काहीही नाही, ते सुंदर आहे. कधीही घाई करू नका. म्हणजेच वेळेची कोणतीही मर्यादा नाही. त्या मर्यादा, ती सीमा आपण स्वतः ठरवत असतो.
Rohan Bopanna 43 व्या वर्षी ग्रँड स्लॅम विजेता!
तसेच मी 43 व्या लेव्हलला आलोय असे समजतो, कारण माझ्या वयाची सर्वांना कल्पना आहे. आज आपण जे आहोत, ते फक्त आपल्याला जे हवे आहे त्याची स्पर्धा करतो आहोत म्हणूनच आहोत. मी सर्वांना हेच सांगेन की, कधीही हार मानू नका आणि कधीची स्वतःवर शंका घेऊ नका. माझ्या इथपर्यंतच्या प्रवासात कुटुंबीयांनी खूप साथ दिली त्यामुळे त्यांचे आभार मानू इच्छितो, असेही रोहन बोपन्नाने सांगितले.
रोहनच्या ऐतिहासिक विजयानंतर विविध स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रोहनच्या वयाचा दाखला देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. शरद पवार यांनी 80 वय झाल्यानंतरही राजकारणातून निवृत्ती न घेतल्यावरून अजित पवार सातत्याने टीका करत असतात.
भारताचा टेनिसपटू @rohanbopanna याने मॅथ्यू एब्डेनच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद पटकावल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन!
रोहन बोपण्णा हे विजेतेपद पटकावणारा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला आहे. प्रतिभा आणि अनुभवाला वयाची मर्यादा नसते, हे त्याने आपल्या खेळातून… pic.twitter.com/0ZiyFxpIkw
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 27, 2024
जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले, “भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्नाने मॅथ्यू एबडेनच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. रोहन बोपन्ना हे विजेतेपद पटकावणारा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला आहे. प्रतिभा आणि अनुभवाला वयाची मर्यादा नसते, हे त्याने आपल्या खेळातून दाखवून दिलंय. लक्षात असू द्या… खेळ असो वा राजकारण, वयाने फरक पडत नसतो. पात्रता महत्त्वाची असते.”
News Title- After Indian tennis star Rohan Bopanna won the Australian Open Grand Slam at the age of 43, NCP MLA Jitendra Awad criticized Ajit Pawar citing age
महत्त्वाच्या बातम्या –
Nitish Kumar | “एकवेळ मरण पत्करु, पण भाजपसोबत जाणार नाही”; नितीश कुमारांचा जुना व्हिडीओ व्हायरल
Maratha Reservation | ‘…त्यांना कुणबी आरक्षण मिळणार नाही’; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Bigg Boss 17 | फिनालेपूर्वीच ‘बिग बॉस’च्या विजेत्याचा खुलासा?, व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का
Maratha Reservation | ‘मराठा आरक्षण अजिबात टिकणार नाही?’, सरकारमधील मंत्र्यानेच बोलून दाखवलं