सेल्फी घेताना तरूणीचा Bobby Deol ला KISS, अभिनेताही अवाक्, video viral

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bobby Deol | बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने शनिवारी त्याचा 55 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने अभिनेत्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. खरं तर बॉबी देओलची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. एक काळ असा होता जेव्हा त्याचा इंडस्ट्रीत दबदबा होता. त्याचे सुरुवातीचे चित्रपट चांगले यशस्वी झाले होते. मात्र त्यानंतर हळूहळू त्यांच्या चित्रपटांची कमाई कमी होऊ लागली.

सेल्फी घेताना तरूणीचा किस

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने शनिवारी त्याचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने ॲनिमल फेम अभिनेत्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. ॲनिमल चित्रपटामुळे बॉबीला पुन्हा एकदा चांगली प्रसिद्धी मिळाली. सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरूणी त्याला किस करताना दिसत आहे. यावर बॉबी देओलनेही प्रतिक्रिया दिली आहे.

अलीकडच्या काळापासून बॉबी देओलची गाडी यशाच्या पटरीवर आल्याचे दिसते. त्याच्या फॅन फॉलोइंगमध्येही वाढ झाली आहे. अशातच त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक महिला फॅन सेल्फी घेताना बॉबीला किस करताना दिसत आहे. तरूणीने सेल्फीसाठी आग्रह केल्यानंतर तेथील सुरक्षारक्षकांनी नकार दिला.

Bobby Deol ला KISS

मात्र, बॉबीने सेल्फी दिली अन् फोटो क्लिक होताच संबंधित तरूणीने किस केला. हे पाहून अभिनेताही शॉक झाला. बॉबी देओलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात बर्थडे बॉय बॉबी देओलला पॅप्सने घेरल्याचे दिसते. दरम्यान, त्याची एक महिला फॅन तिथे येते आणि अभिनेत्यासोबत सेल्फी घेण्याची विनंती करते. बॉबीला भेटून ती महिला खूप आनंदी दिसते आणि बॉबीही तिच्याशी प्रेमाने संवाद साधतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

यानंतर महिलेने सेल्फी घेण्याची विनंती केली अन् फोटो क्लिक करताना ती बॉबी देओलच्या गालावर किस करताना दिसली. महिला चाहत्याने किस करताच बॉबी देओल आश्चर्यचकित झाला. पण त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तो त्याच्या चाहत्यांच्या गोड हावभावाने प्रभावित झाला होता. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी महिला चाहत्याची फिरकी घेतली.

दरम्यान, वाढदिवसाच्या निमित्ताने बॉबी देओलने चाहत्यांना निराश न करता एक खास सरप्राईज दिले आहे. बॉबी देओल आगामी काळात एका साऊथ चित्रपटात दिसणार आहे. अभिनेता सूर्याच्या कांगुवा चित्रपटाचा एक भाग आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूकही समोर आला आहे.

News Title- A video of a female fan kissing Bollywood actor Bobby Deol while taking a selfie is going viral on social media
 महत्त्वाच्या बातम्या –

Rohan Bopanna 43 व्या वर्षी ग्रँड स्लॅम विजेता! वयाचा दाखला देत आव्हाडांची विरोधकांवर टीका

Nitish Kumar | “एकवेळ मरण पत्करु, पण भाजपसोबत जाणार नाही”; नितीश कुमारांचा जुना व्हिडीओ व्हायरल

Gunaratna sadavarte | ‘राज ठाकरे मालक झालाय का? राज ठाकरेंचं कर्तुत्व काय?’, गुणरत्न सदावर्तेंचा खोचक सवाल

Maratha Reservation | ‘…त्यांना कुणबी आरक्षण मिळणार नाही’; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

Bigg Boss 17 | फिनालेपूर्वीच ‘बिग बॉस’च्या विजेत्याचा खुलासा?, व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का