“सरकार पाडण्यासाठी ‘आप’च्या आमदारांना 25 कोटींची ऑफर”, Arvind Kejriwal यांचा गौप्यस्फोट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Arvind Kejriwal | बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळामुळे ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का बसल्याचे दिसते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपला रोखण्याच्या उद्देशाने ‘इंडिया’ आघाडीची स्थापना करण्यात आली. ही आघाडी बनवण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मोठा हात आहे. मात्र, आता तेच नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत जाणार असल्याचे कळते. आज ते पदाचा राजीनामा देऊन नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात असे बोलले जात आहे. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी एक मोठा गौप्यस्फोट केला.

आम आदमी पक्षाने केंद्रातील सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, अलीकडेच भारतीय जनता पक्षाने आमच्या दिल्लीतील 7 आमदारांशी संपर्क साधला. काही दिवसांनी मला अटक केली जाईल. त्यानंतर आमदार फोडले जातील. त्यांची 21 आमदारांशी चर्चा झाली आहे. इतरांशीही चर्चा सुरू आहे. त्यानंतर दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडतील. तुम्ही पण येऊ शकता. 25 कोटी रूपये देऊ आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची संधी देऊ, असे आश्वासन देण्यात आले.

‘आप’चे गंभीर आरोप

आम आदमी पक्षाने म्हटले आहे की, भाजपने 21 आमदारांशी संपर्क साधल्याचा दावा केला असला तरी आमच्या माहितीनुसार त्यांनी आतापर्यंत केवळ 7 आमदारांशी संपर्क साधला आहे. आमच्या सर्व आमदारांनी भाजपची ऑफर नाकारल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.

केजरीवाल म्हणाले की, याचा अर्थ असा की, दारू घोटाळ्याची चौकशी सुरू आहे, त्यावरून मला अटक करता येत नाही. उलट दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. मागील नऊ वर्षांत आमचे सरकार पाडण्यासाठी अनेकदा षडयंत्र रचले गेले. पण आमच्या आमदारांनी या सगळ्याचा एकजुटीने सामना केला.

 

Arvind Kejriwal यांचा गौप्यस्फोट

अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील शिक्षण मंत्री आतिशी मार्लेना यांनीही केजरीवाल यांच्या आरोपांचे समर्थन केले. ऑपरेशन कमल अंतर्गत भाजपने आम आदमी पार्टीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला आणि ‘आप’च्या सात आमदारांना प्रत्येकी 25 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. या माध्यमातून भाजपने गोवा, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकारे पाडली, असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.

भाजपने आरोप फेटाळले

भारतीय जनता पक्षाचे दिल्ली युनिटचे नेते कपिल मिश्रा यांनी ‘आप’च्या आरोपांवर म्हटले की, अरविंद केजरीवाल खोटे बोलत आहेत आणि या प्रकरणातील त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड यापूर्वीही असाच होता. असे आरोप यापूर्वी सात वेळा करण्यात आले आहेत. ते सातत्याने असे बोलून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असतात.

News Title- Chief Minister Arvind Kejriwal has claimed that the BJP has offered Rs 25 crore to MLAs to topple the Aam Aadmi Party government in Delhi
 महत्त्वाच्या बातम्या –

सेल्फी घेताना तरूणीचा Bobby Deol ला KISS, अभिनेताही अवाक्, video viral

Rohan Bopanna 43 व्या वर्षी ग्रँड स्लॅम विजेता! वयाचा दाखला देत आव्हाडांची विरोधकांवर टीका

Nitish Kumar | “एकवेळ मरण पत्करु, पण भाजपसोबत जाणार नाही”; नितीश कुमारांचा जुना व्हिडीओ व्हायरल

Gunaratna sadavarte | ‘राज ठाकरे मालक झालाय का? राज ठाकरेंचं कर्तुत्व काय?’, गुणरत्न सदावर्तेंचा खोचक सवाल

Maratha Reservation | ‘…त्यांना कुणबी आरक्षण मिळणार नाही’; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले