लाईव्ह सामन्यात Babar Azam चा संयम सुटला; अम्पायरच्या मध्यस्थीने वाद मिटला, video viral

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Babar Azam | पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम सध्या बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये खेळत आहे. वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर (Babar Azam viral video) त्याला पाकिस्तानी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला. सध्या बाबरचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याचा एका खेळाडूसोबत वाद झाल्याचे दिसते. बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये बांगलादेशी खेळाडू बाबर आझमशी भिडला.

पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचाही संयम सुटला. यानंतर परिस्थिती इतकी बिघडली की मैदानावरील अम्पायर्संना हस्तक्षेप करावा लागला. बांगलादेश प्रीमिअर लीगच्या 12 व्या सामन्यात रंगपूर रायडर्स आणि दुर्दंतो ढाका हे संघ आमनेसामने होते. रंगपूरसाठी बाबर आझम सलामीला आला. ढाका संघाच्या अराफतने 13व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बाबरच्या संघाच्या नुरुल हसनचा बळी घेताच नाट्यमय घडामोडींना सुरूवात झाली.

अम्पायरच्या मध्यस्थीने वाद मिटला

यानंतर दुर्दंतो ढाकाचा यष्टिरक्षक इरफान सुकूरने बाबर आझमला स्लेज केले. मग बाबर आझमने त्याला जशाश तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोन्ही खेळाडू समोरासमोर आले. त्यानंतर पंचांनी प्रकरण शांत केले. या सामन्यात बाबर आझमने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने 46 चेंडूत 62 धावांची खेळी खेळली.

Babar Azam चा संयम सुटला

बाबरने त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. बाबर आझमच्या संघाने 20 षटकांत 8 बाद 183 धावा केल्या. प्रत्युत्तरात ढाका संघ 16.3 षटकांत 104 धावांवर गारद झाला. अशाप्रकारे रंगपूर रायडर्सने 79 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. बाबरची खेळी निर्णायक ठरली.

 

दरम्यान, अलीकडेच पाकिस्तानी संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता, जिथे शेजाऱ्यांना पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला. त्याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाकिस्तानला एकही कसोटी सामना जिंकता आला नाही. पाकिस्तानी संघाच्या पराभवाचे सत्र सुरूच असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डातही भूकंप होत आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तानने विश्वचषकानंतर कसोटी संघाची धुरा शान मसूदकडे तर ट्वेंटी-20 संघाचे कर्णधारपद शाहीन शाह आफ्रिदीकडे सोपवले आहे. मात्र, अद्याप पाकिस्तानने एकही वन डे सामना खेळलेला नाही.

News Title- video of former Pakistan captain Babar Azam getting angry in Bangladesh Premier League is going viral
 महत्त्वाच्या बातम्या –

PWD Department | नोकरीसाठी जात बदलली! बड्या अधिकाऱ्यांसह 136 जण रडारवर

लेक प्रसिद्धीच्या शिखरावर अन् ‘बापमाणूस’ जमिनीवर; Rinku Singh च्या वडिलांचा भावनिक video

14 वर्षापूर्वी मित्राचं ऐकलं असतं तर आज पश्चात्ताप झाला नसता; Sania Mirza चं मोठं विधान

“सरकार पाडण्यासाठी ‘आप’च्या आमदारांना 25 कोटींची ऑफर”, Arvind Kejriwal यांचा गौप्यस्फोट

सेल्फी घेताना तरूणीचा Bobby Deol ला KISS, अभिनेताही अवाक्, video viral