Bihar Politics | ‘…म्हणून मी राजीनामा दिला’; नितीश कुमारांनी सांगितलं खरं कारण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bihar Politics | बिहारमध्ये (Bihar Politics) मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी सकाळी 11 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत घरोबा करणार आहेत. नितीश यांनी भाजपला पाठिंब्याचं पत्र देऊन सरकार स्थापनेची चर्चा केली आहे. यानंतर नवं सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे.

नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार

नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार आज नवव्यांदा बिहारचे (Bihar Politics) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तसेच गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा ते शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली. नितीश कुमार आजच भाजपसोबत सरकार बनवू शकतात.

Bihar Politics | …म्हणून मी राजीनामा दिला- नितीश कुमार

आम्ही महागठबंधनशी नातं तोडलं आहे, असं नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. राज्यकारभार योग्य रितीने चालत नव्हता. त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली, असं नितीश कुमार यांनी सांगितलं.

आम्ही आधीही भाजपबरोबर युती केली होती. ती युती तोडून राजदबरोबर आघाडी बनवली. पण इथे येऊनही काही सुरळीत चालत नव्हतं. आमच्या लोकांना त्रास होत होता. ते मेहनत घेत होते. परंतु, काही गोष्टींचं त्यांना वाईट वाटत होतं. त्यामुळे मी या निर्णयापर्यंत पोहोचलो, असंही नितीश कुमार म्हणालेत.

भाजप आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहचणार आहे. या ठिकाणी एनडीएच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत नीतीश कुमार यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेडीयू-भाजपचे 3-3 आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही शपथविधीला उपस्थित राहू शकतात. नड्डा 3 वाजता पाटण्याला पोहोचत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

LIC Pension Scheme | ‘…तर महिन्याला मिळेल 20 हजार रुपये पेन्शन’; LIC ची भन्नाट योजना

Nitish Kumar | बिहारमधील राजकीय नाट्याच्या शेवट, अखेर नितीश कुमार यांचा मोठा निर्णय

गायक Rahat Fateh Ali Khan यांच्याकडून नोकराला मारहाण, व्हिडीओ तूफान व्हायरल

लाईव्ह सामन्यात Babar Azam चा संयम सुटला; अम्पायरच्या मध्यस्थीने वाद मिटला, video viral

PWD Department | नोकरीसाठी जात बदलली! बड्या अधिकाऱ्यांसह 136 जण रडारवर