Manoj Jarange | ‘मनोज जरांगेंची औकात नाही, त्यांची लायकी नाही’; ‘या’ नेत्याचं जरांगेंना आव्हान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) सर्व मागण्या मान्य झाल्या असून आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर ओबीसी नेेते आक्रमक झाल्याचं दिसत आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. लक्ष्मण हाके यांनी जरांगेंना खुलं आव्हान दिलं आहे.

लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना आव्हान

लक्ष्मण हाके यांनी जरांगेंची औकात काढली आहे. जरांगेंची औकात नाही. त्यांची लायकी नाही, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर केली आहे. तसेच औकात तर महाराष्ट्राचं सामाजिक न्यायाचं धोरण समजून घ्यावं, असं लक्ष्मण हाके मनोज जरांगेंना (Manoj Jarange) म्हणाले आहेत.

मनोज जरांगे यांनी त्यांच्या लोकांना घेऊन कुठल्याही मीडियाच्या चॅनेल समोर प्रतिवाद करायला यावं, असं आव्हान देखील जरांगेंना दिलं आहे. यावेळी बोलतााना लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील टीका केली आहे.

Manoj Jarange | “मनोज जरांगेंची औकात नाही”

मिंधे सरकारची किंवा शिंदे नावाच्या मुख्यमंत्र्यांची हीच औकात आहे का?. हाच फुले, शाहू आबेंडकरांचा महाराष्ट्र आहे का?, असा सवाल त्यांनी केला आहे. आम्हाला डावललं जात आहे बेदखल केलं जात आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातील रयत अशी अपेक्षित होती का? छत्रपतींचे उटसूट नाव घेता आणि ओबीसी समाजातील माणसांच्या न्यायहक्कांच्या विरोधात मुख्यमंत्री रात्री, अपरात्री अध्यादेश काढतात. राज्यातील ओबीसी समाजातील लोकांना हे अजिबात आवडलेले नाही, असं हाकेंनी म्हटलंय.

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना या महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांची रयत समजून घ्येयाची असेल, महाराष्ट्राचा पुरोगामी विचार समजून घ्यायचा असेल, महाराष्ट्राचे सामाजिक न्यायाचं धोरण समजून घ्यायचं असेल, तर चर्चेला या. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला आम्ही तयार आहोत, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

जीआर काढल्यानंतर Manoj Jarange यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय!

Ketaki Chitale | केतकी चितळे पुन्हा वादात; नेटकरी भडकले, ‘मराठा जातीबद्दल किती द्वेष’

Bihar Politics | ‘…म्हणून मी राजीनामा दिला’; नितीश कुमारांनी सांगितलं खरं कारण

LIC Pension Scheme | ‘…तर महिन्याला मिळेल 20 हजार रुपये पेन्शन’; LIC ची भन्नाट योजना

Nitish Kumar | बिहारमधील राजकीय नाट्याच्या शेवट, अखेर नितीश कुमार यांचा मोठा निर्णय