Shreyas Talpade | ‘या’ कारणामुळे श्रेयसने सर्वांपासून मोठी गोष्ट लपवली!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shreyas Talpade | मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीतच नाही तर बाॅलिवूडमध्ये देखील नाव कमवलं आहे. सोशल मीडियावर श्रेयसची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. काही दिवसांपूर्वी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर श्रेयसला रुग्णालयातून घरी आणल्यावर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आणि नेटकऱ्यांचे आभार मानले. आपल्या चाहत्यांसाठी श्रेयस त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर नवनवीन फोटो पोस्ट करत असतो.

श्रेयसने सर्वांपासून काय लपवलं?

श्रेयस (Shreyas Talpade) त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे कायम चर्चेत असतो. मात्र फार कमी वेळा तो त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. श्रेयसच्या लग्नाबाबत एक माहिती समोर आली आहे. श्रेयसला त्याचं लग्न सगळ्यांपासून लपवावं लागलं. मात्र, श्रेयसची लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे.

काॅलेजमध्ये असताना श्रेयस आणि दिप्ती यांची पहिली भेट झाली होती. यावेळेस दिप्तीला पाहून, पहिल्या नजरेतच श्रेयस दिप्तीच्या प्रेमात पडला. त्यानंतर या दोघांची ओळख झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर काही दिवसातच या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण श्रेयस याला दिप्तीसोबत झालेलं लग्न लपवावं लागलं.

नेमकं काय घडलं?

श्रेयस (Shreyas Talpade) आणि दिप्ती यांचं लग्न झालं मात्र श्रेयसचा ‘इकबाल’हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार होता. सिनेमा प्रदर्शित होण्याच्या सहा महिन्यांपूर्वी श्रेयस याने दिप्ती हिच्यासोबत लग्न केलं. श्रेयसने लग्न केलं म्हणून सिनेमाचे दिग्दर्शक नागेश कुकुनूर नाराज होते. मात्र श्रेयसचं लग्न झालं असं चाहत्यांना समजलं तर त्याचा परिणाम सिनेमावर होईल याची भीती दिग्दर्शकाला होती.

श्रेयसचं लग्न रद्द करण्यात आलं

दरम्यान, नागेश यांनी श्रेयसला लग्न रद्द कर म्हणून सांगितलं. पण मध्यम वर्गीय घरातील लग्न होतं. शिवाय लग्नाच्या पत्रिका वाटून झाल्या होत्या. म्हणून लग्न रद्द करणं शक्य नव्हतं. एवढंच नाही तर, लग्नासाठी श्रेयस याला सुट्ट्या देखील मिळणार नव्हत्या.

shreyas talpade

त्यानंतर दिग्दर्शकांनी विचार केला की, श्रेयस सिनेमात डेब्यू करत आहे आणि अशात लग्न केल्यास सिनेमावर आणि श्रेयसच्या करियरवर वाईट परिणाम होतील. मात्र श्रेयसने दिग्दर्शकांना सांगितलं की, मी लग्नाबद्दल कोणालाही सांगणार नाही. तेव्हा लग्नासाठी अभिनेत्याला एका दिवसाची सुट्टी मिळाली आणि श्रेयस आणि दिप्तीचं लग्न झालं.

News Title :  Due to ‘this’ reason, Shreyas talpade hide ‘that’ thing from everyone

महत्त्वाच्या बातम्या-

Bihar Politics | मोठी बातमी! नितीश कुमार यांनी नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Pune News | पुणे हादरलं, मराठी अभिनेत्रीवर मुळशीत बलात्कार!

Maratha Reservation | मराठा आरक्षणावर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला नारायण राणेंचा विरोध, म्हणाले…

Manoj Jarange | ‘मनोज जरांगेंची औकात नाही, त्यांची लायकी नाही’; ‘या’ नेत्याचं जरांगेंना आव्हान

जीआर काढल्यानंतर Manoj Jarange यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय!