Bihar Politics | मोठी बातमी! नितीश कुमार यांनी नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bihar Politics | नितीश कुमार यांनी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. बिहारचे (Bihar Politics) राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी नितीशकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

नितीश कुमार नवव्यांदा मुख्यमंत्री

नितीशकुमार यांनी आज सकाळीच राजभवन गाठून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजप नेत्यांशी चर्चा केली आणि संध्याकाळी शपथविधी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात एकूण आठ मंत्री असणार आहेत. तर दोन उपमुख्यमंत्रीही असणार आहे.

Bihar Politics | ‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

विजय चौधरी, बिजेंद्र प्रसाद यादव, प्रेम कुमार, श्रवण कुमार, संतोष कुमार सुमन, सुमित कुमार सिंह यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत होते ते संतोष कुमार सुमन यांचा मुलगा, एनडीएचा घटक हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे संरक्षक जीतन राम मांझी.

गेल्या तीन दिवसांपासून ते चर्चेत होते. त्यांच्या पक्षाचे चार आमदार आहेत. मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर सोहळा संपला आहे. शपथविधी समारंभ संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत अभिनंदन केलं.

बिहारमध्ये (Bihar Politics) स्थापन झालेलं एनडीए सरकार राज्याच्या विकासासाठी आणि तेथील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, असं मोदींनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल नितीश कुमार, सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. मला विश्वास आहे की ही टीम माझ्या राज्यातील माझ्या कुटुंबियांची पूर्ण समर्पणाने सेवा करेल.

महत्त्वाच्या बातम्या- 

Pune News | पुणे हादरलं, मराठी अभिनेत्रीवर मुळशीत बलात्कार!

Maratha Reservation | मराठा आरक्षणावर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला नारायण राणेंचा विरोध, म्हणाले…

Manoj Jarange | ‘मनोज जरांगेंची औकात नाही, त्यांची लायकी नाही’; ‘या’ नेत्याचं जरांगेंना आव्हान

जीआर काढल्यानंतर Manoj Jarange यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय!

Ketaki Chitale | केतकी चितळे पुन्हा वादात; नेटकरी भडकले, ‘मराठा जातीबद्दल किती द्वेष’