IND vs ENG | आतापर्यंतचा आमचा सर्वात मोठा विजय; इंग्लंडच्या कर्णधारानं सांगितलं कारण

IND vs ENG | सध्या इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून विजयी सलामी देण्यात पाहुण्या इंग्लिश संघाला यश आले. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा 28 धावांनी पराभव केला. भारतीय संघाने दुसऱ्या डावात केलेली खराब कामगिरी पराभवाचे प्रमुख कारण ठरले.

पहिला सामना जिंकल्यानंतर इंग्लिश संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने एक मोठे विधान केले. तो म्हणाला की, कर्णधारपदाला सुरुवात केल्यापासूनचा हा आमचा सर्वात मोठा विजय आहे. खरं तर स्टोक्स कर्णधार म्हणून भारतात प्रथमच कसोटी सामने खेळत आहे. पहिल्या डावात भारतीय संघाचा दबदबा दिसला. पण इंग्लंडच्या ओली पोपने भारतीयांची झोप उडवली अन् तोंडचा घास पळवला.

भारताचा 28 धावांनी पराभव

सामन्यानंतर इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला, “मी कर्णधारपद स्वीकारल्यापासून एक संघ म्हणून आम्ही अनेक चांगले क्षण अनुभवले आहेत. आम्हाला अनेकदा विजय मिळाले आहेत, आम्ही अनेक महान सामन्यांचा भाग आहोत. आम्ही आता कुठे आहोत, कुठे खेळत आहोत हे पाहता हा विजय आमचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. 100 टक्के या विजयामुळे आमचे मनोबल वाढेल. कर्णधार म्हणून येथे येण्याची माझी पहिलीच वेळ आहे.”

पहिल्या डावात आणि मैदानावर भारतीय रोहित शर्माला पाहून तो कसा आणि काय शिकला हे इंग्लिश कर्णधाराने सांगितले. स्टोक्स म्हणाला की, मी एक चांगला निरीक्षक आहे. मी मैदानावरील आमच्या पहिल्या डावातून खूप काही शिकलो. मी भारतीय फिरकीपटूंना कसे चालवले जाते ते पाहिले, रोहित शर्माने कसे क्षेत्ररक्षण केले आणि अनेक गोष्टी कशा आपल्या डावात आणण्याचा प्रयत्न केला हे पाहिले. टॉम हार्टलीने पदार्पणात 9 बळी घेतले आणि ओली पोपने खांद्यावर शस्त्रक्रिया करून पुनरागमन केले आणि अप्रतिम खेळी केल्याचा आनंद आहे.

 

IND vs ENG इंग्लंडची विजयी सलामी

तसेच हार्टली प्रथमच संघात आला आहे. त्याला मी खूप आत्मविश्वास दिला. काहीही झाले तरी मी त्याला मोठ्या कालावधीपर्यंत संधी द्यायची हे मी ठरवले होते. कारण मला त्याच्या क्षमतेबद्दल माहिती आहे. पहिल्या सामन्यातून खूप नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि पुढेही शिकत राहीन, असेही स्टोक्सने सांगितले.

दरम्यान, पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लिश संघाने विजयी सलामी दिली आहे. पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाहुणा संघ अडखळला. प्रत्युत्तरात भारताने सांघिक खेळी करून पहिला डाव आपल्या नावावर केला. मात्र, दुसऱ्या डावात ओली पोप नावाचे वादळ आले अन् सामन्याचा निकाल बदलला.

News Title- England captain Ben Stokes hailed the win as India’s biggest ever after losing the first Test against England by 28 runs
 महत्त्वाच्या बातम्या –

IND vs ENG Test | लाज वाटली पाहिजे!, ‘या’ 4 कारणांमुळे झाला टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव

iPhone 15: आयफोन 15ची नवी किंमत ऐकून खरेदीसाठी एकच झुंबड, पुन्हा या किंमतीत मिळणार नाही!

INDvsENG | रोहित शर्मा चांगलाच भडकला, ‘या’ खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Shreyas Talpade | ‘या’ कारणामुळे श्रेयसने सर्वांपासून मोठी गोष्ट लपवली!

Ayesha Khan | “त्यांनी मला पहिल्या मजल्यावर नेलं आणि…”, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रकार