कॉलेजच्या Hostel मध्ये इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीने दिला मुलाला जन्म, प्रसूतीनंतर आईचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hostel | कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थीनीने मुलाला जन्म दिला अन् प्रसूतीनंतर बाळाची आई दगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आंध्र प्रदेशातील नंदयाला जिल्ह्यातील एका इंजिनीअरिंग विद्यार्थीने कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये मुलाला जन्म दिला आहे. अचानक पोटात दुखू लागल्याने तिने आई-वडिलांना फोन केला होता. यानंतर ती टॉयलेटमध्ये गेल्यावर तिथेच प्रसूती झाली. मग तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तिथे जास्त रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.

नंदयाला जिल्ह्यातील पान्यम मंडल येथील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्येच मुलाला जन्म दिल्याने खळबळ माजली. यावेळी जास्त रक्तस्त्राव झाल्याने तरूणीचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही विद्यार्थिनी तीन महिन्यांपूर्वीच या हॉस्टेलमध्ये राहायला आली होती. तिने स्वत: फोन करून कुटुंबीयांना पोटदुखीची माहिती दिली. तिचे कुटुंबीय आले तेव्हा ती टॉयलेटमध्ये होती, जिथे तिची प्रसूती झाली.

प्रसूतीनंतर आईचा मृत्यू

दरम्यान, मुलीला खूप रक्तस्त्राव झाल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंतच्या तपासात ही विद्यार्थिनी कॉलेजमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. ती दुसऱ्या वर्षात होती.

तीन महिन्यांपूर्वीच ती या हॉस्टेलमध्ये शिफ्ट झाली होती. दुसरीकडे, विद्यार्थिनी गर्भवती असल्याची कोणतीही माहिती नसल्याचे कॉलेज प्रशासनाने सांगितले. विद्यार्थिनीसोबत राहणाऱ्या मुलींना देखील या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. खरं तर तिच्या प्रसूतीची बातमी ऐकून तिच्या मैत्रिणीनांही धक्का बसला. माहितीनुसार, विद्यार्थिनीने शुक्रवारी संध्याकाळी उशिरा तिच्या पालकांना फोन केला आणि तिला पोटात तीव्र वेदना होत असल्याचे सांगितले.

Hostel मधील विद्यार्थिनीचा मृत्यू

ही माहिती मिळताच तिचे पालक हॉस्टेलमध्ये आले. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थिनीचा त्रास वाढल्याने ती टॉयलेटमध्ये गेली. मात्र बराच वेळ ती बाहेर न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. तरूणी खूप वेळानंतरही बाहेर न आल्याने दरवाजा तोडावा लागला. तेव्हा विद्यार्थिनी आत बेशुद्ध अवस्थेत पडली होती, तर तिच्याजवळ रक्ताने माखलेले बाळही पडले होते.

तिथून त्यांना एका सरकारी रुग्णालयात रेफर करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिला उपचारासाठी आणण्यास बराच विलंब झाला आणि विद्यार्थिनीच्या शरीरातून खूप रक्त वाहत होते. त्यामुळे अनेक प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. सुदैवाने बाळ सुखरूप आहे. सध्या याप्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

News Title- An engineering student died after giving birth in a college hostel in Andhra Pradesh’s Nandyal district
महत्त्वाच्या बातम्या –

IND vs ENG Test | लाज वाटली पाहिजे!, ‘या’ 4 कारणांमुळे झाला टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव

iPhone 15: आयफोन 15ची नवी किंमत ऐकून खरेदीसाठी एकच झुंबड, पुन्हा या किंमतीत मिळणार नाही!

INDvsENG | रोहित शर्मा चांगलाच भडकला, ‘या’ खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Shreyas Talpade | ‘या’ कारणामुळे श्रेयसने सर्वांपासून मोठी गोष्ट लपवली!

Ayesha Khan | “त्यांनी मला पहिल्या मजल्यावर नेलं आणि…”, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रकार