Bihar Politics | “मला विश्वास आहे की…”, Nitish Kumar यांना PM मोदींच्या शुभेच्छा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bihar Politics | बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबतचे सरकार पाडले. त्यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत सरकार बनवले आहे. नितीश यांनी रविवारी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितीश कुमार यांच्यासोबत भाजपचे विजय कुमार सिन्हा आणि सम्राट चौधरी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीश कुमार यांचे शपथविधीबद्दल अभिनंदन केले आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपला रोखण्यासाठी रणनीती आखणारे नितीशच भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाले आहेत. नितीश यांचा जदयू पुन्हा एकदा एनडीएचा भाग झाला आहे. नवीन सरकारचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार यांच्यासह त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

नितीश कुमार नवव्यांदा मुख्यमंत्री

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, “बिहारमध्ये स्थापन झालेले एनडीए सरकार राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. मी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन करतो. मला विश्वास आहे की ही टीम राज्यातील माझ्या कुटुंबियांची पूर्ण समर्पणाने सेवा करेल.”

 

मोदींच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना आणि आभार मानताना नितीश यांनी म्हटले, “मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल बिहारच्या सर्व जनतेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. बिहारमध्ये एनडीए आघाडीसोबत नवे सरकार स्थापन झाले आहे. जनता ही मालक आहे आणि त्यांची सेवा करणे हे आमचे मूळ उद्दिष्ट आहे. केंद्र आणि राज्यात एनडीए आघाडीचे सरकार आल्याने विकासकामांना गती मिळेल आणि राज्य आणखी प्रगती करेल.”

 

Bihar Politics देशाच्या केंद्रस्थानी

बिहारमधील नितीश कुमार यांच्या या खेळीनंतर विरोधी पक्षांनी नितीश यांच्यासह भाजपला लक्ष्य केले. खरं तर काही महिन्यांपूर्वी भाजपला रोखण्यासाठी इंडिया या आघाडीची स्थापना करण्यात आली. ही आघाडी स्थापन करण्यासाठी नितीश यांनीच पुढाकार घेतला होता. मात्र, आता त्यांनीच भाजपशी हातमिळवणी केल्याने मोठा पेच तयार झाला आहे.

नितीश कुमार यांच्या पाचव्या राजकीय यू-टर्नमुळे त्यांना ‘पलटूमार’ किंवा ‘पलटू कुमार’ अशा शब्दांत विरोधकांनी डिवचले. ‘पलटूमार’ म्हणजे अशी व्यक्ती जी आपली भूमिका सातत्याने बदलत राहते. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर म्हणाले की, मी सुरुवातीपासून म्हणत आलो आहे की नितीश कुमार कधीही बदलू शकतात. हा त्यांच्या राजकारणाचा भाग झाला आहे. पण आजच्या घडामोडीने हे दाखवून दिले आहे की बिहारमधील सर्व पक्ष आणि नेते ‘पलटूमार’ झाले आहेत.

News Title- Prime Minister Narendra Modi has wished Nitish Kumar after taking oath as the Chief Minister of Bihar for the ninth time
महत्त्वाच्या बातम्या –

Nitish Kumar News | “भावी पंतप्रधानांना भाजपने मुख्यंमंत्री पदापर्यंतच कायम ठेवले”

कॉलेजच्या Hostel मध्ये इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीने दिला मुलाला जन्म, प्रसूतीनंतर आईचा मृत्यू

IND vs ENG | आतापर्यंतचा आमचा सर्वात मोठा विजय; इंग्लंडच्या कर्णधारानं सांगितलं कारण

IND vs ENG Test | लाज वाटली पाहिजे!, ‘या’ 4 कारणांमुळे झाला टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव

iPhone 15: आयफोन 15ची नवी किंमत ऐकून खरेदीसाठी एकच झुंबड, पुन्हा या किंमतीत मिळणार नाही!