Team India | गिलला बाकावर बसवण्याची वेळ आलेय का? दुसऱ्या सामन्यासाठी भारताची अशी असेल तयारी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Team India | भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज शुभमन गिल सध्या फ्लॉप शोचा सामना करत आहे. मागील वर्ष गाजवणारा गिल यंदाच्या वर्षाच्या सुरूवातीला निराशाजनक कामगिरी करत आहे. 70 दिवस, 10 डाव, 132 धावा आणि 13.20 अशी सरासरी असलेल्या गिलला काही काळ विश्रांती द्यायला हवी असे मत जाणकारांनी व्यक्त केले. शुभमन गिलच्या या कामगिरीनंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मासमोर हा प्रश्न असेल. हैदराबाद कसोटीत इंग्लंडने ज्या प्रकारे भारताविरुद्ध पलटवार केला आणि तोंडचा घास पळवला हे लक्षणीय होते. भारताला सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला.

पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून पाहुण्या इंग्लंडने विजयी सलामी दिली. भारताला पहिल्या सामन्यात 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे दुसरा कसोटी सामना खेळायचा आहे. हैदराबाद कसोटीत 28 धावांनी झालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर पुनरागमन करण्याचे दडपण असेल.

गिलला बाकावर बसवण्याची वेळ आले?

हैदराबाद कसोटीत काही खेळाडूंची कामगिरी चांगली होती, तर बहुतेकांची साजेशी होती आणि दोन खेळाडू असे होते ज्यांना काहीच छाप सोडता आली नाही. पहिल्या डावात 23 धावा करणाऱ्या शुभमन गिलला दुसऱ्या डावात खातेही उघडता आले नाही. तर मोहम्मद सिराजला सामन्यात एकही बळी घेता आला नाही. भारतीय संघ विशाखापट्टणम कसोटी सामन्यात उतरेल तेव्हा या दोन खेळाडूंच्या कामगिरीचा नक्कीच विचार करावा लागेल.

शुभमन गिल मागील काही काळापासून कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. अशा परिस्थितीत संघातून वगळणे गिलचे मनोधैर्य खचू शकते, असेही जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच रोहित शर्मा-राहुल द्रविड या कर्णधार-प्रशिक्षक जोडीचा तरी असा विश्वास आहे. रोहित-द्रविड आणि विराट कोहली-रवी शास्त्री या जोडीतील एक मोठा फरक म्हणजे यापूर्वी प्लेइंग इलेव्हनमध्ये वारंवार बदल होत होते. तर रोहित-द्रविड खेळाडूंना पुरेशी संधी देण्याच्या बाजूने आहेत.

Team India दुसऱ्या सामन्यासाठी संघात बदल?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी इरफान पठाणने सोशल मीडियाद्वारे युवा सर्फराज खानसाठी बॅटिंग केली होती. इरफानच्या या पोस्टमध्ये सर्फराज खानचे आकडे दाखवण्यात आले होते. सर्फराज सध्याच्या टीम इंडियात नाही. रजत पाटीदारचा संघात नक्कीच समावेश आहे. रजत पाटीदारने जानेवारीतच इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन शतके झळकावली होती. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 151 धावांची खेळी केली आणि सलामी करताना त्याने 111 धावा केल्या. म्हणजेच नवीन चेंडूचा सामना करताना त्याने ही शतके झळकावली.

 

24 वर्षीय शुभमन गिलने मागील वर्षी 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या विश्वचषक फायनलपासून भारतासाठी 7 सामने खेळले आहेत. गिलने या 7 सामन्यांच्या 10 डावांमध्ये अनुक्रमे 4, 0, 8, 2, 26, 36, 10, 23, 23, 0 अशा धावा केल्या आहेत. या कामगिरीनंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याची मागणी होत होती. जर रोहित ब्रिगेडने शुभमन गिलला वगळले तर त्यांच्याकडे रजत पाटीदार नावाचा पर्याय असेल. आता कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलवर विश्वास ठेवतो की रजत पाटीदारला पदार्पणाची संधी देतो हे पाहण्याजोगे असेल.

News Title- After the defeat in the first Test match against England, there is a possibility of changes in Team India for the second match
 महत्त्वाच्या बातम्या –

Bihar Politics | “मला विश्वास आहे की…”, Nitish Kumar यांना PM मोदींच्या शुभेच्छा

Nitish Kumar News | “भावी पंतप्रधानांना भाजपने मुख्यंमंत्री पदापर्यंतच कायम ठेवले”

कॉलेजच्या Hostel मध्ये इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीने दिला मुलाला जन्म, प्रसूतीनंतर आईचा मृत्यू

IND vs ENG | आतापर्यंतचा आमचा सर्वात मोठा विजय; इंग्लंडच्या कर्णधारानं सांगितलं कारण

IND vs ENG Test | लाज वाटली पाहिजे!, ‘या’ 4 कारणांमुळे झाला टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव