Bigg Boss 17 | ‘बिग बॉस’ 17 हा लोकप्रिय शो आता संपला आहे. काल (28 जानेवारी) त्याचा अंतिम एपिसोड (Bigg Boss 17) होता. या फिनालेमध्ये नेहमीप्रमाणे सलमान खानने होस्ट करत विजेत्याची घोषणा केली. मात्र, विजेत्याचे नाव ऐकून सर्वांनाच धक्का बसला. फिनालेसाठी अंकितासह लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी यांच्यात लढत होती.
यात सर्वांत अगोदर अरुण माशेट्टी बाहेर झाला. यानंतर टॉप 4 मध्ये सामील झाल्यानंतर सलमान खानने एक घोषणा केली. ती ऐकताच अंकितासह तिचा पती विकी जैनचे लगेच डोळे पाणावले. यासोबतच अंकितालाही मोठा धक्का बसला. या घोषणेबाबत स्वतः सलमान खानही चकित होता.
सलमान खानदेखील झाला चकित
सलमान खानने टॉप 4 मध्ये (Bigg Boss 17) जागा मिळवल्यानंतर अंकिता आता शोचा भाग नसणार, अशी घोषणा केली. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. ‘मला वाटलं होतं तू विजेती होशील, पण हे बघून मलाही धक्का बसलाय’, असं सलमान म्हणाला. सलमानचे हे शब्द ऐकून अंकिता भावुक झाल्याचं दिसून आलं
यावेळी अंकिताची आईदेखील तिथे उपस्थित होती. ‘मी अजून लवकर बाहेर पडले असते तर समस्या झाली असती असं मला वाटतं. पण यावेळी माझी आई आता इथे सोबत असल्याने मी खुश आहे,’, असं अंकिता म्हणाली. यावेळी तिचा पती विकी जैनदेखील भावूक झाला. त्याच्या डोळ्यांतून लगेच पाणी आलं.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे दोघे बिग बॉसमध्ये सामील होताच त्यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाली. अगदी सुरुवातीच्या दिवसापासून त्यांच्यात भांडण झाल्याचं दिसून आलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा इथे खरं तर तमाशाच पाहायला मिळाला. पती-पत्नीत इतके टोकाचे वाद झाले की आता ते विभक्त होणार, असंही म्हटलं गेलं. मात्र नन्यत्र दोघांनाही आपल्या चुकांची जाणीव झाली. मात्र अंकिता विजेती न ठरल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला.
‘Bigg Boss 17’ची ट्रॉफी कुणाच्या नावावर?
सर्वांना बिग बॉसचा (Bigg Boss 17) विजेता कोण ठरणार याची आतुरता होती. अखेर याचा खुलासा झाला आहे. सलमान खानने मुनव्वर फारुकीच्या (Munawar Faruqui) नावाची घोषणा करताच एकच जल्लोष करण्यात आला. 28 जानेवारीला याचा अंतिम (Bigg Boss 17 ) एपिसोड झाला. याच दिवशी मूनव्वरचा वाढदिवसदेखील होता. त्यामुळे मुनव्वरला वाढदिवशीच मोठं गिफ्ट मिळालं. त्याला बिग बॉसच्या ट्रॉफीसह मोठी रक्कमही मिळाली आहे. त्यामुळे मुनव्वर बिग बॉसमुळे मालामाल झाला आहे. तर अभिषेक कुमार शोचा फर्स्ट रनरअप ठरला. मात्र विजेता डोंगरीचा स्टार मुनव्वर फारूकीच ठरला.
News Title- Bigg Boss 17 Vicky Jain gets emotional
महत्त्वाच्या बातम्या –
Animal Movie च्या टीकाकारांना रणबीर कपूरचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाला…
Team India | गिलला बाकावर बसवण्याची वेळ आलेय का? दुसऱ्या सामन्यासाठी भारताची अशी असेल तयारी
Bihar Politics | “मला विश्वास आहे की…”, Nitish Kumar यांना PM मोदींच्या शुभेच्छा
Nitish Kumar News | “भावी पंतप्रधानांना भाजपने मुख्यंमंत्री पदापर्यंतच कायम ठेवले”
कॉलेजच्या Hostel मध्ये इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीने दिला मुलाला जन्म, प्रसूतीनंतर आईचा मृत्यू