Ncp | राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ncp | महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिला. सुनावणीत त्यांनी ठाकरे गट आणि शिंदे गट कोणाच्याही आमदाराला अपात्र ठरवलं नाही. शिंदे गटाला त्यांनी अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. आता राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp) आमदारांचं अपात्रता प्रकरण आहे.

अजित पवार गट आणि शरद पवार गट निर्माण झाले. शरद पवार गट विरोधी बाकांवर बसतो, तर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. शिवसेनेसारखंच हे प्रकरण आहे. या प्रकरणी सुनावणी सुरु आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिली मुदत वाढवून

सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालायने मुदत दिली आहे. राहुल नार्वेकर यांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तीन आठड्यांचा वेळ मागितला होता. मात्र सर्वोच्च न्यायालायने नार्वेकरांना तीन नाही, दोन आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे.

Ncp | “31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होईल”

आज तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितलं की, 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होईल. पण निकाल लिहिण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ द्या. पण कोर्टाने मात्र त्यांना 15 दिवसांचा वेळ दिला आहे, असं वकील सिद्धार्थ शिंदेंनी सांगिलं.

वेळ जरी थोडा वाटत असला, तरी निवडणूक आयोगाचा निकाल काय लागतो हे पाहणे महत्वाचं आहे. तो आला तर त्या आधारावर नार्वेकर निकाल देऊ शकतात, जसं की त्यांनी शिवसेनेच्या निकालाच्या बाबतीत केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? चिन्ह कोणाला मिळणार? या बाबत निवडणूक आयोगाचा निकाल आज किंवा या आठवड्यात कधीही येऊ शकतो, असं वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले.

दरम्यान, नार्वेकरांनी ठाकरे गट आणि शिंदे गट कोणाच्याही आमदाराला अपात्र ठरवलं नाही. आता राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकर काय निर्णय देतात पाहणं महत्वाचं ठरणारे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Bigg Boss 17 | ..अन् अंकितासाठी पती विकी जैन ढसाढसा रडला; सलमान खानही झाला चकित

Animal Movie च्या टीकाकारांना रणबीर कपूरचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाला…

Team India | गिलला बाकावर बसवण्याची वेळ आलेय का? दुसऱ्या सामन्यासाठी भारताची अशी असेल तयारी

Bihar Politics | “मला विश्वास आहे की…”, Nitish Kumar यांना PM मोदींच्या शुभेच्छा

Nitish Kumar News | “भावी पंतप्रधानांना भाजपने मुख्यंमंत्री पदापर्यंतच कायम ठेवले”