Ahmednagar Accident | मन सुन्न करणारी घटना; कंटेनरच्या धडकेमुळे भीषण अपघात, सहा महिन्यांच्या बाळासह…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ahmednagar Accident | अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावरील पांढरी पुलाजवळ काल रात्री एका भरधाव कंटेनर चालकाने दोन दुचाकींना धडक देऊन पळ काढला. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.

कंटेनरच्या धडकेमुळे भीषण अपघात

मृतांमध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पारनेर पोलिसांनी अपघाताला दुजोरा दिला आहे.

Ahmednagar Accident | अख्खं कुटुंब संपलं 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल बाळासाहेब पवार (वय 28, रा. पारनेर वडगाव) हे त्यांची पत्नी सोनाली अनिल पवार (22), मुलगा अनिल पवार (11) आणि सहा महिन्यांच्या मुलासह दुचाकीवरून घरी परतत होते. पांढरी पुलाजवळ मागून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या वाहनाला चिरडलं. त्याचवेळी कंटेनरने अन्य एका दुचाकीलाही धडक दिली.

या अपघातात अनिल बाळासाहेब पवार व त्यांच्या कुटुंबीयांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा दुचाकीस्वार भगवान आव्हाड हा जखमी झाला. कंटेनर चालकाचा शोध सुरू असल्याचं पारनेर पोलिसांचं म्हणणं आहे.

नागरिकांचा रोष पाहताच कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मृत पवार कुटुंबीय वडगाव सावताळ येथील रहिवासी होते. रविवारी कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर एकाच स्कूटीवरून ते घरी परतत होते.

अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर भीषण (Ahmednagar Accident) अपघात (Ahmednagar Accident) होत आहेत. शुक्रवार (26 जानेवारी) देखील महामार्गावर झालेल्या अपघातात सहाजण जखमी झाल्याची घटना घडली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

Ncp | राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट समोर!

Bigg Boss 17 | ..अन् अंकितासाठी पती विकी जैन ढसाढसा रडला; सलमान खानही झाला चकित

Animal Movie च्या टीकाकारांना रणबीर कपूरचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाला…

Team India | गिलला बाकावर बसवण्याची वेळ आलेय का? दुसऱ्या सामन्यासाठी भारताची अशी असेल तयारी

Bihar Politics | “मला विश्वास आहे की…”, Nitish Kumar यांना PM मोदींच्या शुभेच्छा