संसदेत तूफान राडा; खासदारांनी एकमेकांना उचलून फेकलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maldives Parliament | मालदीवच्या संसदेत सध्या सर्कससारखं दृश्य पाहायला मिळत आहे. मालदीवच्या संसदेत सध्या मारामारी आणि गोंधळ सुरू आहे. रविवारी मालदीवच्या संसदेत मुइज्जू मंत्रिमंडळासाठी मतदान होणार होतं. मात्र विरोधी पक्ष एमडीपीने चार मंत्र्यांची मान्यता रोखणार असल्याचं स्पष्टपणं सांगितलं. याच्या निषेधार्थ मालदीवमधील सत्ताधारी पक्ष निषेधार्थ उतरला आहे.

मालदीवच्या संसदेत तूफान राडा

सत्ताधारी आघाडीचे खासदार PPM-PNC सभागृहात विरोध करत आहेत. ते सभागृहात अल्पसंख्य असल्यामुळे त्यांना मतदान द्यायचं नाही. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की सभागृहात अल्पसंख्याक असूनही मुइज्जू अध्यक्ष कसे झाले?. मालदीवमधील लोकशाही प्रक्रिया भारतापेक्षा खूपच वेगळी आहे.

नेमकं काय घडलं?

काही खासदारांनी तर विरोधी पक्षाच्या सदस्यांना उचलून जमिनीवर आपटलं. लाथा बुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक खासदार दुसऱ्याचा पाय ओढत असल्याचं दिसत आहे. संसदेत (Maldives Parliament) डोळ्यासमोर ही घटना घडत असताना अध्यक्ष मुइज्जू मात्र पहात राहिले होते

आधी मालदीवची व्यवस्था समजून घेऊ आणि त्यानंतर कळेल मालदीवमध्ये सध्या काय चाललं आहे? मालदीवच्या संसदेला पीपल्स मजलिस म्हणतात. मालदीवमध्ये खासदार आणि राष्ट्रपतींची निवडणूक स्वतंत्रपणे घेतली जाते. गेल्या वर्षी मालदीवमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या. पीपल्स मजलिसच्या सदस्यांची निवडणूक 2019 मध्ये झाली.

मालदीवमध्ये जनता थेट राष्ट्राध्यक्षाची निवड करते. ज्या उमेदवाराला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळतात तो राष्ट्रपती म्हणून निवडला जातो. कुणालाही पन्नास टक्के मते मिळाली नाहीत, तर सर्वाधिक मते मिळवणाऱ्या दोन उमेदवारांमध्ये लढत असते.

ज्याला सर्वाधिक मते मिळतात तो अध्यक्ष म्हणून निवडला जातो. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत मोहम्मद मुइज्जू यांना 54 टक्के मते मिळाली होती. 2019 मध्ये खासदार निवडून आले. 17 मार्च 2024 रोजी पुन्हा एकदा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत निवडणुका होईपर्यंत विरोधी पक्षाकडे सभागृहात बहुमत असेल. तो मुइझूची कोणतीही हालचाल अगदी सहज थांबवू शकतो. मुइज्जूच्या आघाडीचे खासदार सभागृहात विरोध करत आहेत. संसद भवनाबाहेर सरकार समर्थकांची गर्दी जमली आहे. 22 सदस्यीय मंत्रिमंडळाला मंजुरी देण्यासाठी दुपारी 1.30 वाजता संसदेत मतदान होणार होतं. मुज्जू यांच्या पक्षाचे खासदार सतत आतून आवाज काढत होते. तुतारी वाजवज होते. सभागृहाच्या आतील व्हिडीओमध्ये खासदार सभापतींच्या खुर्चीजवळ आवाज करत असल्याचं दिसत आहे. मतदान होऊ नये म्हणून खासदारांमध्ये चढाओढही पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ-

महत्त्वाच्या बातम्या- 

Bigg Boss 17 | डोंगरीचा स्टार मुनव्वर झाला मालामाल; ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसह मिळाली ‘एवढी’ रक्कम

Ahmednagar Accident | मन सुन्न करणारी घटना; कंटेनरच्या धडकेमुळे भीषण अपघात, सहा महिन्यांच्या बाळासह…

Ncp | राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट समोर!

Bigg Boss 17 | ..अन् अंकितासाठी पती विकी जैन ढसाढसा रडला; सलमान खानही झाला चकित

Animal Movie च्या टीकाकारांना रणबीर कपूरचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाला…