India Vs England Test Series | पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा खेळाडू होणार बाहेर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

India Vs England Test Series | हैदराबाद येथे झालेल्या कसोटी सामन्यात (India Vs England Test Series) भारताला इंग्लंडविरुद्ध 28 धावांमुळे पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावाच्या आधारे 190 धावांची आघाडी मिळाली होती. घरच्या मैदानावर 100 किंवा त्याहून अधिक धावांची आघाडी घेऊनही टीम इंडिया पहिल्यांदाच कसोटी सामना हारला आहे.

आता येत्या 2 फेब्रुवारीला भारत आणि इंग्लंड (India Vs England Test Series) यांच्यात दूसरा कसोटी सामना होणार आहे. विषाखापट्टनम येथे हा सामना खेळवला जाणार आहे. मात्र, त्यापुर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) स्नायूंवर ताण आल्याने तो सामन्यातून बाहेर पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रवींद्र जडेजाला झालेल्या दुखापतीमुळे तो सामन्यात खेळू शकत नाही. आता त्याच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळू शकते. हैदराबाद येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात जडेजाच्या पायाच्या स्नायूंना दुखापत झाली होती. त्यानंतर जडेजा झटपट धाव घेण्याच्या प्रयत्नात होता, पण तो क्रीझपर्यंत पोहोचू शकला नाही आणि बेन स्टोक्सने त्याला धावबाद केले.

रवींद्र जडेजाने भारताच्या पहिल्या डावात 87 धावा केल्या. तसेच त्याने या सामन्यात एकूण पाच विकेट्सही घेतल्या. टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनीही याबाबत स्पष्टपणे काहीही सांगितलं नाही.’मला अद्याप फिजिओशी बोलण्याची संधी मिळालेली नाही. मी परत जाऊन त्यांच्याशी बोलेन आणि काय झाले ते बघेन.’, असे द्रविड म्हणाले आहेत. त्यामुळे अद्याप तरी जडेजा सामन्यात खेळू शकेल की नाही, याबाबत खुलासा झाला नाही.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ‘असा’ असेल भारतीय संघ

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी (India Vs England Test Series) रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद कुमार सिराज, मुहम्मद यादव. , जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार. असा भारतीय संघ असेल.

India Vs England Test Series चे वेळापत्रक-

दूसरा कसोटी सामना : 2 ते 6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम
तिसरा कसोटी सामना : 15 ते 19 फेब्रुवारी, राजकोट
चौथा कसोटी: 23 ते 27 फेब्रुवारी, रांची
पाचवा कसोटी सामना : 7 ते 11 मार्च, धरमशाला

News Title- India Vs England Test Series Jadeja injured

 महत्त्वाच्या बातम्या –

Animal Movie च्या टीकाकारांना रणबीर कपूरचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाला…

Team India | गिलला बाकावर बसवण्याची वेळ आलेय का? दुसऱ्या सामन्यासाठी भारताची अशी असेल तयारी

Bihar Politics | “मला विश्वास आहे की…”, Nitish Kumar यांना PM मोदींच्या शुभेच्छा

Nitish Kumar News | “भावी पंतप्रधानांना भाजपने मुख्यंमंत्री पदापर्यंतच कायम ठेवले”

कॉलेजच्या Hostel मध्ये इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीने दिला मुलाला जन्म, प्रसूतीनंतर आईचा मृत्यू