Maratha Reservation | मराठा आरक्षणावरून नारायण राणे यांचा सरकारला इशारा, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha Reservation | मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन यशस्वी झालं आहे. त्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना सरकारने काढली आहे. त्यामुळेच मनोज जरांगे यांनी समाधान व्यक्त केलं आहे. एकीकडे मराठा समाजामध्ये (Maratha Reservation) जल्लोषाचं वातावरण आहे तर दुसरीकडे सरकारच्या निर्णयाला विरोध केला जात आहे. भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी यावरून सरकारला इशारा दिला आहे.

नारायण राणे यांचा सरकारला इशारा

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला घेरलं आहे. याआधी राणेंनी ट्विट करत पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र पुन्हा त्यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी पत्रकार परिषद घेणार नसल्याचं स्पष्ट करत सरकारला थेट इशारा दिलाय.

मराठा आरक्षण या विषयावर आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. ही पत्रकार परिषद रद्द करण्‍यात येत आहे. या विषयावर मला महाराष्‍ट्र शासनाला विनंती करावयाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या महाराष्‍ट्रात लढवय्येपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण होणार नाही याची काळजी घ्‍यावी, असं राणे म्हणालेत.

Maratha Reservation | “सरकारने सखोल विचार करावा”

या सगळया नाजूक प्रश्‍नाचा महाराष्‍ट्र सरकारने सखोल विचार करावा. महाराष्‍ट्रामध्‍ये मराठा समाजाची संख्‍या 32 टक्‍के म्‍हणजे 4 कोटी एवढी आहे. कोणत्‍याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश महत्त्वाचे आहेत एवढंच मला सांगावं वाटतं, असं राणेंनी म्हटलंय.

स्‍वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्‍ये समाविष्‍ट होऊन आरक्षण घेणार नाही. याशिवाय तसे केल्‍याने इतर मागास वर्ग समाजावर अतिक्रमण होणार आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी कुणबी नोंदी मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सरकारमधील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सर्वात आधी विरोध केला होता. तसेच ओबीसी नेते गोपीचंद पडळकर यांनी देखील सरकारच्या निर्णयाला विरोध केलाय.

 

महत्त्वाच्या बातम्या- 

India Vs England Test Series | पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा खेळाडू होणार बाहेर

संसदेत तूफान राडा; खासदारांनी एकमेकांना उचलून फेकलं

Bigg Boss 17 | डोंगरीचा स्टार मुनव्वर झाला मालामाल; ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसह मिळाली ‘एवढी’ रक्कम

Ahmednagar Accident | मन सुन्न करणारी घटना; कंटेनरच्या धडकेमुळे भीषण अपघात, सहा महिन्यांच्या बाळासह…

Ncp | राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट समोर!