Mahatma Gandhi | ‘गांधीजींची हत्या नथुराम गोडसेने केली नाही’; नव्या दाव्याने खळबळ

Mahatma Gandhi

Mahatma Gandhi | रणजित सावरकर (Ranjeet Savarkar)  लिखित असलेलं ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचं नवी दिल्लीत प्रकाशन झालं आहे. पण प्रकाशानंतर लगेच त्यांचं नवं पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या पुस्तकात रणजित सावकर (Ranjeet Savarkar) यांनी गांधींच्या हत्येबाबत धक्कादायक दावा केला आहे.

रणजित सावरकरांच्या नव्या पुस्तकात अनेक दावे करण्यात आले आहेत. महात्मा गांधींवर नथुराम गोडसेने गोळी झाडली नव्हती, असं ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकात लिहिलं आहे. महात्मा गांधींच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या वेगळ्या दिशेने आल्या होत्या. गांधीजींना मारणारी गोळी नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून आली नव्हती, असा दावा त्यांनी केलाय.

महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत मोठा दावा

रणजित सावरकर यांनीही पुराव्यानिशी दावा केला आहे की, गांधींवर झाडलेल्या गोळ्या गोडसेच्या बंदुकीतून आल्या नसून वेगळ्या दिशेने आल्याचा दावा केला आहे. गांधीजींच्या हत्येमागे कोण आहे, याचा शोध घेण्याचं आवाहनही सावरकरांनी केलं आहे.

नथुराम गोडसे याने झाडलेल्या गोळ्या आणि महात्मा गांधीजींच्या शरीरात आढळलेल्या गोळ्या वेगवेगळ्या होत्या, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. रणजित सावरकर यांचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या पुस्तकावर प्रतिक्रिया दिली आहे. कायदेशीर बाबींचा विचार करूनच आम्ही पुस्तक प्रकाशित करतोय, असं ते म्हणाले आहेत.

Mahatma Gandhi | “नथुराम गोडसे हा गुन्हेगार नव्हता, तो पत्रकार होता”

कर्नल तनेजा यांनी काळजीपूर्वक अहवाल तयार केल्याचं रणजित सावरकर यांनी म्हटलं आहे. गोडसेचा असा विश्वास होता की त्याने गोळ्या झाडल्या पण प्रत्यक्ष गोळ्या इतरांनी चालवल्या. तिथे 200 लोक होते. सुरक्षा होती. नथुराम गोडसे हा गुन्हेगार नव्हता. ते पत्रकार होते. त्यामुळे त्यांना लक्ष्य करणं शक्य नव्हतं. गोडसेने गांधीजींची हत्या केलेली नाही हे या सर्व पुराव्यावरून दिसून येतं. दुसऱ्याच्या गोळीमुळे गांधीजींचा मृत्यू झाला. ते कोण होते याचा शोध घेतला पाहिजे. गांधीजींच्या हत्येचे पुरावे दडपण्यात आल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे.

याशिवाय पुस्तकात अनेक मुद्दे लिहिण्यात आले असून त्यात वल्लभभाई पटेल यांचा गट संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. मग आम्ही ग्रेट ब्रिटनबरोबर व्यापार सुरू केला. 1971 मध्ये हंटर विमान वापरलं. नेहरूंनी इनसायडर ट्रेडिंग केलं, याचा फायदा नेहरू आणि ब्रिटनला झाला. सरकारने यावर आयोग नेमावा, असं आवाहन मी पुस्तकात केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

MS Dhoni | धोनी CSK साठी IPL किती वर्ष खेळणार?; ‘या’ खेळाडूनं सांगितलं

‘बिग बॉस 17’ चा विजेता Munawar Faruqui कधी काळी विकत होता समोसे; जाणून घ्या त्याचा प्रवास

Farmer | धक्कादायक! शेतकऱ्यांकडून अवयव विक्रीला; दुष्काळामुळे अन्नदाता हैराण

Maratha Reservation | मराठा आरक्षणावरून नारायण राणे यांचा सरकारला इशारा, म्हणाले…

India Vs England Test Series | पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा खेळाडू होणार बाहेर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .