‘बिग बॉस 17’ चा विजेता Munawar Faruqui कधी काळी विकत होता समोसे; जाणून घ्या त्याचा प्रवास

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Munawar Faruqui | डोंगरीच्या मूनव्वर फारुकी (Munawar Faruqui ) याने बिग बॉस 17 चा विजेता होत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. बिग बॉसमध्ये सामील होताच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललं गेलं. मात्र चाहत्यांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. म्हणूनच तो बिग बॉसच्या फिनालेपर्यंत गेला.

आज लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा मुनव्वर हा खऱ्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करून इथपर्यंत पोहोचला आहे. त्याने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. सोशल मिडियावर तो स्टँड अप कॉमेडीयन म्हणून प्रचलित आहे. मात्र, त्यापूर्वी त्याचा प्रवास अत्यंत खडतर होता. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

वडिलांच्या कर्जामुळे शिक्षण सोडण्याची वेळ

मूनव्वर (Munawar Faruqui ) तसा गुजरातचा राहणारा. त्याने गुजरातमधील जुनागड येथे आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. वडिलांनी घेतलेल्या कर्जामुळे त्याला लहान वयातच शिक्षण सोडून काम करण्याची वेळ आली. त्यामुळे त्याला पाचवीनंतर शाळा सोडावी लागली होती. त्याची आई आणि आजी आई आणि आजी उत्तम समोसे बनवायची. त्यामुळे मूनव्वर एक स्टॉल लावून समोसे विकायचा.

पुढे त्याने आपले शिक्षण पूर्ण केलं. मुंबईत येऊन त्याने एका गिफ्ट शॉपमध्ये काम केलं. त्याने ग्राफिक डिझायनिंगचाही कोर्स केला होता. पुढे त्याने ग्राफिक डिझायनर म्हणून देखील काम केलं. सोशल मिडियावर तो नंतर स्टँड अप कॉमेडीयन म्हणून प्रचलित होऊ लागला. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

‘बिग बॉस’पुर्वी त्याने ‘लॉकअप’च्या पहिल्या सीझनच्या विजेतेपदावरही नाव कोरलं होतं, त्यामुळे त्याची प्रसिद्धी वाढली. यंदाच्या बिग बॉसच्या सीजनमध्ये सहभाग घेतल्यानंतर त्याची अधिकच प्रसिद्धी वाढली. आता त्याचे लाखांत चाहते आहेत. चाहत्यांच्या सपोर्टमुळे तो याचा विजेताही ठरला. अशा खडतर परिस्थितीचा सामना करत मुनव्वरने आयुष्यात ही ऊंची प्राप्त केली आहे.

मुनव्वर ठरला ‘बिग बॉस 17’ चा विजेता

बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर मुनव्वर (Munawar Faruqui ) मालामाल झाला आहे. त्याला बिग बॉसची ट्रॉफी तर मिळालीच आहे, यासोबतच त्याला ह्युंदाईची चमकणारी क्रेटा कारही मिळाली आहे. तसेच, मुनव्वरला 50 लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले. 15 आठवडे चाललेल्या या शोमध्ये 21 स्पर्धक होते, परंतु मुनव्वर फारुकीने बाजी मारत ट्रॉफी वर आपले नाव कोरले.

यासाठी त्याने जनतेचे आभार मानले आहे. “जनतेचे खूप आभार. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे ट्रॉफी अखेर डोंगरीला आलीच. मला मार्गदर्शन केल्यामुळे मोठे भाऊ सलमान खान यांचे विशेष आभार,” अशी पोस्ट त्याने सोशल मिडियावर केली आहे.

News Title-  Munawar Faruqui real life story 

 महत्त्वाच्या बातम्या –

Animal Movie च्या टीकाकारांना रणबीर कपूरचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाला…

Team India | गिलला बाकावर बसवण्याची वेळ आलेय का? दुसऱ्या सामन्यासाठी भारताची अशी असेल तयारी

Bihar Politics | “मला विश्वास आहे की…”, Nitish Kumar यांना PM मोदींच्या शुभेच्छा

Nitish Kumar News | “भावी पंतप्रधानांना भाजपने मुख्यंमंत्री पदापर्यंतच कायम ठेवले”

कॉलेजच्या Hostel मध्ये इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीने दिला मुलाला जन्म, प्रसूतीनंतर आईचा मृत्यू