Punjab | दारूचा घोट घेऊन स्टेअरिंग हाती घ्याल तर पोलिसांसोबत घरी जाल; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Punjab | आनंदाच्या भरात तर कोणी दु:ख पचवण्यासाठी दारूचा घोट घेत असतो. दारू पिल्यानंतर त्यांना परिस्थितीचे कोणतेच भान नसते. अशातच मद्यपींनी या नशेत गाडीचे स्टेअरिंग हाती घेतल्यावर अनेक अपघात होण्याची शक्यता असते. किंबहुना अशा घटना वारंवार समोर येत आहेत. पण, आता पंजाबमध्ये दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना पोलीस त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवतील. पंजाब सरकारने यात लक्ष घातले असून अपघात टाळण्यासाठी पावले उचलली आहेत.

मुख्यमंत्र्यांची घोषणा

एवढेच नाही तर मद्यपींना घरी पाठवल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनाही मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या अपघातांबाबत सावध केले जाणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Chief Minister Bhagwant Mann) यांनी ही जबाबदारी रस्ते सुरक्षा दलाकडे (Sadak Security Force) सोपवली आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना इशारा दिला असून रस्ते सुरक्षा दल अशा लोकांचे चालानही कापणार आहे. तसेच त्यांची वाहने जप्त केली जातील आणि काही शुल्क आकारून पोलीस मद्यपींना त्यांच्या घरी सोडतील. एवढेच नाही तर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस संबंधित मद्यपींच्या कुटुंबीयांनाही समजावून सांगणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मागील शनिवारी देशातील पहिल्या रोड सेफ्टी फोर्सला (SSF) ग्रीन सिग्नल दिला. यानंतर लगेचच 1239 जवान 144 वाहनांसह रस्त्यावर उतरले. 1 फेब्रुवारीपासून हे दल पूर्णपणे सक्रिय होईल, असा मुख्यमंत्र्यांचा दावा आहे. या दलाच्या माध्यमातून पहिल्या वर्षीच रस्ते अपघातातील मृत्यू निम्मे करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

Punjab सरकारचे अपघात टाळण्यासाठी पाऊल

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, रस्ते अपघात झाल्यास तात्काळ 112 वर कॉल करा. प्रत्येक 30 किलोमीटरच्या अंतरावर कार्यरत असलेली SSF वाहने 10 मिनिटांत अपघाताच्या ठिकाणी पोहोचतील. यावेळी जखमींना मदत केली जाईल आणि त्यांना रुग्णालयात नेईपर्यंत सर्व व्यवस्था केली जाईल.

पंजाब सरकारने अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. अपघाताचे प्रमुख कारण हे दारू असल्याचे अनेक बाबींमधून समोर आले आहे. दारूचा घोट घेतल्यानंतर मद्यपींना ना वेगावर नियंत्रण राहते ना वाहतुकीच्या नियमांवर… त्यामुळे वाहतुकीचे नियम देखील पायदळी तुडवले जातात. अशा घटनांना रोखण्यासाठी पंजाब सरकारने एसएसएफची स्थापना केली आहे.

News Title- Punjab Chief Minister Bhagwant Mann has set up a road safety force to curb drunk driving
महत्त्वाच्या बातम्या –

Kartik Aaryan | अभिनेता कार्तिक आर्यनला ‘ती’ गोष्ट पडली महागात; व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Filmfare Awards 2024 | कोण ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता?, पाहा फिल्मफेअर अवॉर्ड्सची पूर्ण लिस्ट

IRCTC Tour Package | IRCTC देणार विदेशी पर्यटनाची सुवर्णसंधी; जाणून घ्या तुमच्या बजेटमधला प्लॅन

Pushkar Jog | जात विचारली म्हणून मराठी अभिनेत्याने बीएमसी महिला कर्मचारीवर केला…

Uddhav Thackeray | ठाकरे गटाला धक्का देणारी बातमी समोर!