PM मोदींची विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’, Bollywood कलाकारांनाही पडली भुरळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bollywood | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘परीक्षा पे चर्चा’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बोर्डाच्या परीक्षेपूर्वी पंतप्रधान मोदींनी सोमवारी देशभरातील विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ आयोजित केली. या अनुषंगाने दिल्लीतील भारत मंडपम येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात सुमारे 3 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. बॉलिवूड कलाकारांनाही मोदींच्या या कार्यक्रमाने भुरळ घातली.

मोदींची ‘परीक्षा पे चर्चा’

अभिनेत्री कंगना रनौतने पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाचे कौतुक केले आणि सांगितले की, मोदी मुलांना जीवन अतिशय सहजपणे समजावून सांगत आहे. मोदींनी जवळपास 9 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ते विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तर देताना दिसतात. त्यांनी कॅप्शनच्या माध्यमातून लिहिले की, विद्यार्थी करिअरबद्दल विचार करतात हे समजण्यासारखे आहेच… परंतु योग्य समजून घेऊन निर्णय घेतल्याने अशा अनिश्चितता दूर होण्यास मदत होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओवर व्यक्त होताना अभिनेत्री कंगनाने म्हटले, “पंतप्रधान किती सहज आणि जीवनातील रहस्यमय सत्य मुलांना समजावून सांगत आहेत, तरुण पिढीचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या गोंधळलेल्या मनाला कसे टाळावे याबाबत ते मार्गदर्शन करत आहेत.”

 

Bollywood कलाकारांनीही पडली भुरळ

तसेच अभिनेता आर माधवनने देखील मोदींचे कौतुक केले आहे. त्याने लिहले की, विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी शिक्षकांची भूमिका… सर्व काही खूप चांगल्या पद्धतीने सांगण्यात आले आहे… यापेक्षा अधिक सहमत होऊ शकत नाही.

 

कंगना रनौत तिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तिने या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. याचे दिग्दर्शन देखील खुद्द कंगनाने केले आहे. यामध्ये अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमन आणि श्रेयस तळपडे हे कलाकार दिसणार आहेत. 14 जून 2024 हा चित्रपट प्रदर्शित होईल.

आर माधवन लवकरच ‘शैतान’ चित्रपटात दिसणार आहे. हा एक हॉरर चित्रपट आहे. अजय देवगण, ज्योती देशपांडे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘शैतान’चे दिग्दर्शक विकास बहल आहेत. हा चित्रपट 8 मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

News Title- Prime Minister Narendra Modi has been praised by Bollywood actors Kangana Ranaut and R Madhavan on their Pariksha Pe Charcha programme
 महत्त्वाच्या बातम्या –