IND vs ENG | पराभवानंतर भारतीय संघात मोठा बदल; 3 नव्या चेहऱ्यांना संधी, जड्डू-राहुल बाहेर

IND vs ENG | सलामीच्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दमदार फलंदाज लोकेश राहुल आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यामुळे त्यांची रिप्लेसमेंट म्हणून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. (Sarfaraz Khan replaces KL Rahul) यातीलच एक नाव म्हणजे सर्फराज खान. मागील काही काळापासून टीम इंडियाचे तिकिट मिळवण्यासाठी झटणाऱ्या सर्फराजला अखेर ती संधी मिळाली आहे.

हैदराबाद कसोटीतील पराभवानंतर भारताचे दोन खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. त्यामुळे निवडकर्त्यांना दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात बदल करावे लागले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्फोटक कामगिरी करणाऱ्या सर्फराज खानला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

जड्डू-राहुल बाहेर

भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळवला गेला. पाहुण्या संघाने शेवटच्या दोन दिवसांच्या खेळात पलटवार करत भारताविरुद्ध विजयाची नोंद करण्यात यश मिळवले. पहिल्या डावात 246 धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियाने 190 धावांची आघाडी घेतली होती.

पण, दुसऱ्या डावात पाहुण्या संघाच्या ओली पोपने 196 धावांची खेळी करत संघाला सामन्यात पुढे नेले. 231 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला नवख्या टॉम हार्टलीने दुसऱ्या डावात 7 मोठे धक्के दिले. त्यामुळे यजमान संघ केवळ 202 धावांत आटोपला अन् इंग्लिश संघाने विजयी सलामी दिली. 2 फेब्रुवारीपासून दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे.

 

IND vs ENG कसोटीचा थरार

दरम्यान, पहिली कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. मात्र, हा बदल इंग्लंडविरुद्धच्या पराभवामुळे नाही तर खेळाडूंच्या दुखापतीमुळे करण्यात आला आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल दुखापतींमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. त्यांच्या जागी निवड समितीने वॉशिंग्टन सुंदर आणि सर्फराज खान यांच्या नावाची घोषणा केली आहे. आवेश खानला मागील मालिकेतही संधी मिळाली होती. त्याच्याशिवाय सौरव कुमारलाही संघात स्थान देण्यात आले आहे.

सर्फराजला पदार्पणाची संधी?

दुसऱ्या सामन्यासाठी रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, सर्फराज खान, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद यादव. , मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार आणि आवेश खान असा भारतीय संघ आहे. यातील कोणत्या 11 शिलेदारांना संधी मिळते हे पाहण्याजोगे असेल.

News Title- IND vs ENG 2nd test match Ravindra Jadeja KL Rahul ruled out of the second Test from the Indian team and Sourav Kumar, Awshe Khan and Sarfraz got a place in the team

महत्त्वाच्या बातम्या –

Kartik Aaryan | अभिनेता कार्तिक आर्यनला ‘ती’ गोष्ट पडली महागात; व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Filmfare Awards 2024 | कोण ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता?, पाहा फिल्मफेअर अवॉर्ड्सची पूर्ण लिस्ट

IRCTC Tour Package | IRCTC देणार विदेशी पर्यटनाची सुवर्णसंधी; जाणून घ्या तुमच्या बजेटमधला प्लॅन

Pushkar Jog | जात विचारली म्हणून मराठी अभिनेत्याने बीएमसी महिला कर्मचारीवर केला…

Uddhav Thackeray | ठाकरे गटाला धक्का देणारी बातमी समोर!