“मापात रहा, कसला माज दाखवतो तू?, एका दणक्यात तुझं…”; पुष्कर जोगला ‘या’ अभिनेत्याने झापलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pushkar Jog | शिंदे सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यानुसार आता मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलं जाणार आहे. शासनाकडून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कागदपत्र पडताळणी केली जात आहे. यासाठी एक सर्व्हे केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) याने एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

मुंबई महापालिकेचे कर्मचारी याच सर्व्हेसाठी पुष्कर जोगच्या घरी गेले होते. यावेळी त्याने सोशल मीडियावर स्टोरी अपलोड करत संतप्त प्रतिक्रिया दिली होती. मात्र, त्याच्या प्रतिक्रियाने एक नवीनच वाद उभा केला आहे. यावरून आता अभिनेता किरण मानेने थेट पुष्कर जोगला खुले आव्हान दिले आहे. किरण मानेने (Kiran Mane) फेसबुकवर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे.

किरण माने यांची पोस्ट

किरण माने म्हणाले, आमच्या मनोरंजन क्षेत्रातल्या वर्चस्ववाद्यांना हल्ली उन्माद चढलाय. ‘आमचीच सत्ता’ हा पोकळ माज आलाय. मी परवाच ‘अजब गजब’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोललो. दुसर्‍याच दिवशी पुष्कर जोग (Pushkar Jog) नावाच्या, सिनेमात वगैरे काम करणार्‍यानं विधान केलं, “जातगणना करायला आलेली बाई नसती तर मी दोन लाथा घातल्या असत्या.” अरे भावा, ते सरकारनं दिलेल्या आदेशामुळे तुझ्या घरी आलेले साधे कर्मचारी होते रे ते.

त्यांना हौस नाही तुमचे उंबरठे झिजवायचे. तुला लाथाच घालायच्यात ना? लै राग आलाय का तुला जात विचारल्याचा? …मी तुला चॅलेंज देतो, ज्याने हा जातगणनेचा आदेश सोडलाय त्या नेत्याला लाथा घाल. चल, खुल्लं आव्हान आहे माझं. तू जर त्या जातगणनेचा आदेश देणार्‍या सत्ताधारी नेत्याला लाथा नाही घातल्यास तर तू त्या कर्मचार्‍याकडून चार लाथा खायच्या ,बोल. आहे दम तुझ्या पार्श्वभागात?

अरे या नेत्यांचे पाय चाटणारी जमात तुमची. आडनांव घेऊन डिंग्या मारतोयस? काय घंटा इतिहास आहे तुमच्या आडनांवाचा?असला तरी काय खुट्ट्याला बांधायचाय? आपलं काम इमानेइतबारे करणार्‍या कर्मचार्‍यांवर कसला माज दाखवतो तू? हे कर्मचारी जर आपली नोकरी बाजूला ठेवुन तुझ्यासमोर आले ना, तर एका दणक्यात तुझं वाकडं शेपूट सरळ करतील. नाद करू नको गरीबांचा. बुद्धी जागेवर ठेवून बोलत जा. मराठ्यांच्या आणि ओबीसींच्या लढ्यात तू तुझ्या द्वेषाची पोळी भाजून घेऊ नकोस. बहुजन शांत आहेत म्हणून मस्तीत विधानं करणं लै महागात पडेल. मापात रहा, असा थेट इशाराच किरण मानेने दिला आहे.

Pushkar Jog चे ‘ते’ वादग्रस्त विधान नेमकं काय?

“बीएमसीच्या काही कर्मचारी माझ्या घरी आल्या आणि सर्व्हे करतोय, म्हणून मला माझी जात विचारली. ते जर बाईमाणूस नसते तर दोन लाथ नक्कीच मारल्या असत्याघातल्या असत्या. कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका. अदरवाईज, जोग बोलनार नाहीत. तर डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार “, अशा आशयाची पोस्ट पुष्कर जोगने केली होती. यावरून आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

News Title- Kiran Mane challenge to Pushkar Joga

महत्त्वाच्या बातम्या –

Gold-Silver Price Today | सोने-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या आजचे दर

Manoj Jarange | ‘या’ दोन समाजांच्या आरक्षणासाठी जरांगे लढणार, म्हणाले ‘आरक्षण कसं देत नाही तेच बघतो’

SSC Exam Hall Ticket | दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

Filmfare Awards 2024 | अवॉर्ड जिंकल्याचा आनंद गगनात मावेना; आलिया-रणबीरचा डान्स अन् KISS

Hemant Soren | ED ची मोठी कारवाई! मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीतील घरावर छापा, BMW जप्त